Rice Farming : सिमेंटच्या जंगलात बहरतेय भात शेती! आयटी पार्कलगतच्या पुनावळेमध्ये लागवडीला वेग

आयटी पार्कलगतच्या पुनावळे गावात आता मोठे शहरीकरण झाले आहे. जिकडे-तिकडे गगनचुंबी इमारतींच्या सोसायट्या उदयास आल्या आहेत.
Rice Farming
Rice Farmingsakal
Updated on

- बेलाजी पात्रे

हिंजवडी - आयटी पार्कलगतच्या पुनावळे गावात आता मोठे शहरीकरण झाले आहे. जिकडे-तिकडे गगनचुंबी इमारतींच्या सोसायट्या उदयास आल्या आहेत. मात्र, आजही या सिमेंटच्या जंगलात अनेक ग्रामस्थांनी आपली पारंपरिक शेती जपली आहे. या पट्ट्यात पावसाळ्यात होणाऱ्या इंद्रायणी भात पिकाच्या लागवडीला वेग आला असून, भात शेती बहरत असल्याचे चित्र आहे.

यंदा पावसाचं आगमन झालं. मात्र, समाधानकारक तो बरसल्याने भात शेतीची खाचरं पाण्याने भरली आहेत. त्यामुळे इंद्रायणी रोपांच्या लागवडीच्या कामाला वेग आला आहे. या लागवडीमुळे राने हिरवाईने नटली आहेत. चहूबाजूंनी आधुनिकतेचे प्रतीक असलेली मोठाली सिमेंटची जंगले आणि मधोमध बळीराजांकडून पारंपरिक पद्धतीने सुरु असलेली भात रोपांची लागवड असे जुन्या-नव्याचा संगम घालणारे मनोहारी दृष्य पुनावळे परिसरात पहायला मिळत आहे.

बागायत शेती व तरकारी पुरवठादार म्हणून पूर्वी पुनावळे गाव प्रसिद्ध होते. येथील बहुतांश ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय हा शेतीच होता. शेजारून वाहणाऱ्या पवना नदीमुळे गावाचा परिसर सुजलम सुफलम होता. मात्र, कालांतराने शहरीकरण वाढू लागल्याने इमारतीच्या जंगलांनी हा परिसर वेढून गेला. त्यामुळे शेतीचे क्षेत्र प्रचंड घटले. आजतागायत फक्त ३० टक्के शेती क्षेत्र पुनावळेत उरले आहे. मात्र, जेवढी शेती शिल्लक आहे त्या शेतीला शेतकरी आज जिवापाड जपत आहेत. तिची निगा राखून हंगामनिहाय पिके घेत आहेत.

यंदा पाहिजे तसा पाऊस अद्याप झाला नाही. जेवढे पावसाचे पाणी जास्त असेल तेवढे इंद्रायणी भाताचे पाणी पीक बहरते. पाऊस कमी झाल्याने बोअरवेल आणि विहिरीतील पाण्यावर सध्या भात लागवड सुरू आहे.

- हेमंत कोयते, शेतकरी, पुनावळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.