देहू - मुबलक पाणी, दळण-वळणाची सोय आणि कमी भाडेदर या कारणांमुळे देहू नगरपंचायतीच्या हद्दीत गेल्या तीन वर्षांत नागरीकरणाबरोबरच लघुउद्योग क्षेत्राची झपाट्याने वाढ झाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेपेक्षा कमी दरात उद्योगासाठी जागा उपलब्ध होत असल्याने चिखली, तळवडेऐवजी उद्योजकांनी देहू नगरपंचायतीच्या हद्दीत व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे स्थानिक युवक, महिलांना रोजगारही मिळत आहे.