कोण आला रे कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला!

क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड याचे जुनी सांगवीकरांनी रविवारी (ता. १७) सकाळी ६:१५ च्या सुमारास फटाक्यांची आतषबाजी करत दिमाखात स्वागत केले.
Ruturaj Gaikwad
Ruturaj GaikwadSakal
Updated on

जुनी सांगवी - जुन्या सांगवीतील मधुबन सोसायटीत राहणारा शैलीदार क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड याचे जुनी सांगवीकरांनी रविवारी (ता. १७) सकाळी ६:१५ च्या सुमारास फटाक्यांची आतषबाजी करत दिमाखात स्वागत केले.

इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल)च्या या हंगामात चेन्नई संघाकडून खेळताना महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना त्याने या सत्रात सर्वाधिक (६३५) धावा करत ऑरेंज कॅप पटकावली. तसेच संघाच्या विजयात मोठे योगदान दिले. जुन्या सांगवीत वाढलेल्या ऋतुराजचे रविवारी सकाळी घरी आगमन होताच त्याचे फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले. या वेळी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. कोरोना प्रतिबंधक खबरदारी घेत ‘मधुबन’मधील गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन ऋतुराज घरी गेला. ऋतुराज घरी आज परत येणार असल्याची माहिती नसल्याने व्यायामासाठी तसेच फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनीही ऋतुराज दिसताच त्याला शुभेच्छा दिल्या.

Ruturaj Gaikwad
तरूण-तरूणीचा दुचाकी रस्तादुभाजकाला धडकून मृत्यू

या वेळी कोरोनाच्या खबरदारीमुळे चाहत्यांची गर्दी टाळण्यासाठी ऋतुराजच्या घरी येण्याबाबत गुप्तता पाळण्यात आली. वडील दशरथ गायकवाड यांनी पहाटे मोजक्या नातेवाईक व मित्रपरिवाराला त्याच्या येण्याची वार्ता कळवली. आई सविता गायकवाड व सांगवीकर महिला भगिनींनी लाडक्या ऋतुराजचे औक्षण करून घरी स्वागत केले. परिसरातील मित्र परिवाराने त्याच्या येण्याची बातमी कळताच घरी धाव घेतली‌‌. ‘कोण आला रे कोण आला,’ ‘महाराष्ट्राचा वाघ आला’ या जयघोषाने त्याचे स्वागत करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.