Sakal Education Expo : पिंपरी-चिंचवडमध्ये आठ जूनपासून करिअर मार्गदर्शन

दहावी आणि बारावीचा निकाल लागला आहे. लवकरच ‘सीईटी’चा (संयुक्त प्रवेश चाचणी) निकाल लागणार आहे.
Sakal Vidya Education Expo
Sakal Vidya Education Exposakal
Updated on

पिंपरी : दहावी आणि बारावीचा निकाल लागला आहे. लवकरच ‘सीईटी’चा (संयुक्त प्रवेश चाचणी) निकाल लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही उच्च शिक्षणासाठीच्या प्रवेशाचे वेध लागले आहेत.

त्यातही उच्च शिक्षणासाठी अभ्यासक्रम निवडीची तयारी झाली आहे. त्यासाठी महाविद्यालय वा शैक्षणिक संस्था निवडायची आहे, शिक्षणाबरोबरच करिअरची नेमकी दिशा ठरवायची आहे. त्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने आठ व नऊ जून रोजी काळेवाडीतील रागा पॅलेसमध्ये ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४’ या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. त्यात सहभागासाठी शैक्षणिक संस्थांची नोंदणी सुरू झाली आहे.

दहावी-बारावीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनात अनेक चिंता असतात. कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा? करिअर कशात करायचे? कोणत्या संस्थेत प्रवेश घ्यायचा? मात्र, काहींची करिअरची दिशा ठरलेली आहे.

त्यानुसारच बारावी उत्तीर्ण झालेल्यांनी सीईटीची परीक्षा दिलेलीही आहे. मात्र, काहींच्या मनात अजूनही गोंधळ आहे. काय करावं सूचत नाही, अशी अवस्था आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्यांच्या मनात तर अनेक शंकांचे मोहोळ आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी ‘सकाळ’ने विद्या एज्युकेशन एक्स्पोचे आयोजन केले आहे.

बुकिंग कोण करू शकते ?

पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील नामांकित शिक्षण संस्थांना या प्रदर्शनात सहभागी होता येईल. प्रदर्शनात विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती व मार्गदर्शनपर चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांपासून कोचिंग क्लासेस, व्यावसायिक क्लासेसच्या ‘यूजी’ आणि ‘पीजी’ अभ्यासक्रमांसाठी येथे स्टॉलचे बुकिंग करता येणार आहे.

एकाच ठिकाणी माहिती

महाविद्यालयीन प्रवेश, दहावी-बारावीनंतर शिक्षणाच्या उपलब्ध असणाऱ्या पर्यायांची माहिती; याशिवाय कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, पॅरामेडिकल, आर्किटेक्चर, माहिती तंत्रज्ञान यांसह अन्य अभ्यासक्रमांच्या माहितीचे प्रदर्शन यात असणार आहे. त्याचबरोबर जेईई, नीट, सीईटी यांसह अन्य स्पर्धा परीक्षांबाबतही मार्गदर्शन करणाऱ्या शैक्षणिक संस्था यात सहभागी होऊ शकतात.

येथे करा स्टॉलचे बुकिंग

शैक्षणिक प्रदर्शनात तुम्हाला तुमचा स्टॉल असावा असे वाटतंय ना! तर मग लवकरात लवकर संपर्क साधा आणि शिक्षण आणि करिअरबाबत मार्गदर्शन, माहिती विद्यार्थी-पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तयार व्हा!

संपर्क : अमोल : ८३७८९८७८३६ सचिन : ९७३०९५९६९९

काय?, केव्हा?, कधी?, कुठे?

काय? : सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४

कधी? : शनिवार, ता. ८ आणि रविवार, ता. ९ जून

केव्हा? : सकाळी ११ ते रात्री ८

कुठे? : रागा पॅलेस, विजयनगर, काळेवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.