पिंपरी - कोणत्याही खेळासाठी शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते. तंदुरुस्तीचा मूळ पाया म्हणजे व्यायाम. त्यातील सर्वांत सहजपणे करण्यासारखा व्यायाम म्हणजे चालणे किंवा धावण्याचा व्यायाम होय. त्याबाबत जनजागृती करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यातर्फे पिंपळे सौदागर रविवारी (ता. १३) ‘सकाळ १० किलोमीटर रन’ स्पर्धा आयोजित केली आहे. त्याबाबत उत्सुकता वाढली आहे.
पिंपळे सौदागर येथील बाळासाहेब कुंजीर मैदान येथून स्पर्धेला रविवारी (ता. १३) सकाळी सहा वाजता प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील धावपटूंना दिल्या जाणाऱ्या टी-शर्टचे अनावरण महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते झाले आहे. तीन आणि दहा किलोमीटर अशा दोन प्रकारात स्पर्धा होणार असून, मार्गही निश्चित झाला आहे.
आता प्रत्यक्ष स्पर्धेची प्रतीक्षा आहे. यामध्ये सहकुटुंब अनेक जण सहभागी झाले आहेत. पाच वर्षांच्या मुलापासून ८० वर्षांच्या आजोबांपर्यंतचे नागरिक ‘रन’मध्ये सहभागी झाले आहेत. राजकीय, आरोग्य, क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून स्पर्धेसाठी धावपटूंना शुभेच्छा देण्यात येत आहेत.
आज टी शर्ट, ‘बीब’ वाटप
मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविलेल्या धावपटूंना शनिवारी (ता. १२) रामनगर, रहाटणी येथील थोपटे बॅंक्वेटस येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी पाच या वेळेत टी-शर्ट आणि चेस्ट नंबर अर्थात ‘बीब’ दिले जाणार आहेत. सर्व सहभागी धावपटूंनी आपले टी-शर्ट आणि ‘बीब’ घेऊन जावेत, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
वाहनतळ सुविधा (पार्किंग)
पिंपळे सौदागर येथील गोविंद गार्डन चौक, पी. के. स्कूल चौक, पी. के. स्कूल चौक ते पी. के. स्कूल रस्ता येथे वाहनतळाची (पार्किंग) व्यवस्था केली आहे. स्पर्धा स्थळ बाळासाहेब कुंजीर मैदानापासून पार्किंगसाठी निश्चित केलेली ठिकाणे जवळ आहेत.
अशी असेल स्पर्धा १० किलोमीटर
पुरुष - वय १६ ते ४५ वर्षे आणि ४५ वर्षांवरील - प्रत्येकी तीन विजेते
महिला - वय १६ ते ४० वर्षे आणि ४० वर्षांवरील - प्रत्येकी तीन विजेते
सर्वांत ज्येष्ठ - पुरुष आणि महिला - प्रत्येकी तीन विजेते
स्पर्धकांसाठी वेळा
१० के रन - रिपोर्टिंग पहाटे ५.१५, प्रारंभ सकाळी ६.१५
३ के रन - रिपोर्टिंग सकाळी ६.३०, प्रारंभ सकाळी ७.३०
लोकप्रतिनिधी म्हणतात...
आजकाल धावपळीच्या जीवनात उत्तम आरोग्य हे अतिशय महत्त्वाचे आहे. यासाठी चालणे, धावणे, योगा यांसारखे सहज साधे-सोपे व्यायाम प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. निरोगी जीवनासाठी व्यायाम हा संदेश ‘सकाळ’च्या ‘१० के रन’मधून मिळेल. आरोग्यदायी जीवनाचे महत्त्व पटवून देणाऱ्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाला शुभेच्छा!
- सुप्रिया सुळे, खासदार, बारामती मतदार संघ
‘सकाळ’ नेहमीच स्तुत्य उपक्रम राबवीत असतो. व्यायामासाठी जनजागृती करीत असतो. अनेक जण स्वतःच्या जीवनशैलीकडे दुर्लक्ष करतात. पण, त्यांनी किमान चालणे, धावणे असे व्यायाम करायला हवेत. यामुळे तंदुरुस्ती वाढते. ‘सकाळ’ने आता मॅरेथॉन आयोजित केली आहे. त्यात सहभागी होऊन, नागरिकांनी वेगळा आनंद घ्यावा.
- श्रीरंग बारणे, खासदार, मावळ
व्यायामामुळे शारीरिक तंदुरुस्ती वाढते. माणूस सुदृढ राहतो. यासाठी व्यायामासारखे अन्य दुसरे औषध नाही. शिवाय, नियमित व्यायामामुळे प्रतिकारशक्ती वाढते. दैनंदिन जीवनात उत्साह राहतो. स्वतःच्या फायद्यासाठी, स्वास्थ्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. किमान चालणे किंवा धावण्याचा व्यायाम आवश्यक आहे.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी
आपले आयुष्य हे धकाधकीचे व धावपळीचे झाले आहे. त्यामुळे संतुलित आहार व योग्य व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायामासाठी वेळ नाही ही सबब आपण सर्वच देत असतो. मात्र दिवसभरात किमान पंधरा मिनिटे ते तासभर चालण्याचा धावण्याचा व्यायाम केला तरी आपले आरोग्य निरोगी राहील. म्हणून ‘सकाळ’ मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे!
- अण्णा बनसोडे, आमदार, पिंपरी
नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने थोडा वेळ काढणे आवश्यक आहे. दैनंदिन कामामुळे प्रत्येकाची ऊर्जा कमी होत असते. ती पुन्हा भरून काढण्यासाठी आहाराबरोबरच नियमित व्यायाम महत्त्वाचा असून, त्यामुळे शरीराला नवी ऊर्जा मिळते. शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी प्रत्येकानेच किमान चालणे, धावण्याचा व्यायाम करावा.
- उमा खापरे, सदस्या, विधान परिषद
कोरोनोनंतर तरुणांमध्ये ह्रदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. काहींची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. याला तोंड देण्यासाठी नियमित चालणे आणि धावणे आवश्यक आहे. कारण, हे दोन्ही व्यायाम प्रकार सहज करता येऊ शकतात. ‘सकाळ’ने वाचकांना वाचनाची आवड लावली आहे. आता व्यायामाची आवड लावत आहे, त्याबद्दल शुभेच्छा!
- अमित गोरखे, सदस्य, विधान परिषद
आपल्या सुदृढ आरोग्यासाठी प्रत्येकाने व्यायामासाठी वेळ काढणे आवश्यक आहे. चालणे व धावणे हा अत्यंत साधा व्यायाम प्रकार आहे. हा व्यायाम कोणीही करू शकतो. म्हणूनच धावण्याच्या उत्तम व्यायामाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘सकाळ’ व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यावतीने पिंपळे सौदागर येथे रविवारी ‘सकाळ १० किमी रन’चे आयोजन केले आहे. त्यात नागरिकांनी सहभागी व्हावे.
- बापू बांगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड
अधिक माहितीसाठी
संपर्क - प्रशांत बोऱ्हाडे, मोबाईल क्र. ८३८००७४८२३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.