Sakal Vastu Expo 2023 : चिंचवडला आजपासून ‘सकाळ वास्तू एक्स्पो’

चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये शनिवार (ता. १५) व रविवारी (ता. १६) ‘सकाळ वास्तू एक्स्पो २०२३’ आयोजित केले आहे.
Sakal Vastu Property Expo 2023
Sakal Vastu Property Expo 2023sakal
Updated on
Summary

चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये शनिवार (ता. १५) व रविवारी (ता. १६) ‘सकाळ वास्तू एक्स्पो २०२३’ आयोजित केले आहे.

पिंपरी - चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये शनिवार (ता. १५) व रविवारी (ता. १६) ‘सकाळ वास्तू एक्स्पो २०२३’ आयोजित केले आहे. त्याचे उद्‍घाटन शनिवारी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. एक्स्पोमध्ये शहराच्या विविध भागांतील ३० पेक्षा अधिक बांधकाम व्यावसायिक सहभागी झाले आहेत. त्यांच्या दीडशेपेक्षा अधिक गृहप्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे.

अनेकांना स्वतःच घर हवं असतं. आपल्या मनानुसार त्याला सजवलं जातं. पण, दैनंदिन कामाची धावपळ आणि वेगवेगळ्या ठिकाणी असलेले गृहप्रकल्प त्यामुळे त्यांची माहिती घेणे शक्य होत नाही. मात्र, अशा व्यक्तींना स्वप्नातील व मनातील घराचा मुहूर्त साधण्याची संधी ‘सकाळ वास्तु एक्स्पो’मधून नागरिकांना उपलब्ध झाली आहे.

बांधकाम व्यावसायिक म्हणतात...

- सागर मारणे, ए. व्ही. कार्पोरेशन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, संचालक : जाधववाडी, चिखली, मोशी या नव्याने विस्तारलेल्या भागात विठ्ठल लॅंडमार्क आणि विठ्ठल कॅपिटल या आमच्या बांधकाम प्रकल्पात सध्या वन ॲंड टू बीचके उपलब्ध आहेत. नागरिकांची सध्या या भागाला पसंती आहे. परवडणारी व बजेटमधील घरे उपलब्ध आहेत. त्यासाठी त्यांना विस्तृत माहिती ‘सकाळ एक्स्पो’च्या माध्यमातून मिळण्यास मदत होईल.

- संजय डागा, सूरज इन्फो, संचालक : ‘सकाळ एक्स्पो’मुळे विविध बजेटमधील घरे नागरिकांना पाहता येतील. ग्राहकाला त्यांच्या आवडीनिवडी व ॲमिनिटीज पाहता येतील. फ्लॅटबाबत माहिती मिळेल. किमान १० ते १२ प्रकल्प पाहण्यासाठी जाण्याचा वेळ वाचेल. शौर्य रेसिडेन्सी या नावाने लोहगावमधील आमच्या प्रकल्पात दीड आणि टू बीएचके रेडी पझेशन घरे सध्या उपलब्ध आहेत.

- सुरेंद्र आगरवाल, संचालक, बालाजी डेव्हलपर्स : ‘सकाळ एक्स्पो’च्या माध्यमातून बांधकाम प्रकल्पांची माहिती मिळते. दहा ठिकाणी जाण्याऐवजी एका ठिकाणी प्रकल्पाची निवड करणे सोपे जाते. आमचा तिरुपती टॉवर्स प्रकल्प शिवतेजनगरमध्ये बर्ड व्हॅलीजवळ आहे. दोन आणि तीन बीएचके उपलब्ध आहेत. ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रदूषणविरहित स्कीम आणि राहण्यायोग्य आहे. चार ते पाच महिन्यात नागरिकांना राहण्यासाठी मिळेल.

- संदीप वाघेरे, संचालक, वाघेरे असोसिएट्स : नेहरूनगर आणि भोसरीत वाघेरे असोसिएट्स प्रकल्प आहे. दोन आणि तीन बीएचके घरे आमच्याकडे उपलब्ध आहेत. लवकरच नवीन स्कीम वाकड, कस्पटेवस्ती या ठिकाणी येत आहे. या एक्स्पोमुळे नागरिकांना सर्व ठिकाणांची माहिती एकत्रित मिळते. घराजवळ उपयुक्त व सर्व सुविधायुक्त घराच्या शोधात नागरिक असतात. त्यांची स्वप्नपूर्ती होण्याचे हे ठिकाण आहे.

- डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील, संचालक, अजिंक्य टॉवर्स : चऱ्होलीत अपाक बिझनेस इन्होवेशन प्रायव्हेट लिमिटेड या आमच्या घरांच्या प्रकल्पातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सरकार मान्य ही योजना आहे. सध्या ही घरे सर्वसामान्यांना परवडणारी आहेत. सध्या आमच्याकडे वन बीएचके एक हजार ४४२ घरे उपलब्ध आहेत.

- विराज गावडे, संचालक, गावडे रिॲलिटी एलएलपी : रावेतमधील आमचा गावडे गॅलॅक्सी बांधकाम प्रकल्प हा प्राइम लोकेशनवर आहे. लाल विटामधील आमचे बांधकाम आहे. सध्या टू बीएचके आमच्याकडे उपलब्ध आहेत. घरांचा साधारणत: सहा महिन्यात ताबा मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे सर्व बांधकाम हे वास्तुशास्त्रानुसार केले आहे.

- नीतेश पटेल, संचालक, व्हिजन क्रिएटिव्ह : आमच्याकडे बांधकाम प्रकल्पाचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. पारदर्शकपणे व्यवहार हे आमचे ब्रीद आहे. सध्या मोशीतील व्हीजन ऱ्हिथम या आमच्या प्रोजेक्टमध्ये टू बीएचके उपलब्ध आहेत. सर्वसामान्यांना परवडणारी घरे आहेत. तर, रावेत या ठिकाणी व्हीजन अरेस्टो या प्रकल्पात तीन बीएचके तयार होत आहेत. एक्स्पोच्या माध्यमातून या प्रकल्पांची सर्व माहिती नागरिकांना मिळेल.

घर घेण्यासाठी अनुकूल वेळ

  • आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी राज्य सरकारने रेडीरेकनरचे दर वाढविले नाहीत

  • रेडीरेकनरचे दर न वाढल्याने घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्काची जुन्या दरानेच आकारणी

  • रेडीरेकनर दर व मुद्रांक शुल्क वाढ नसल्याने घरांच्या किमती स्थिर

  • अनेकांची पगारवाढ होऊन क्रयशक्ती वाढल्याने बॅंकांकडून कर्ज सुविधा

सकाळ वास्तू एक्स्पोत काय?

  • शहर परिसरातील मोठमोठ्या बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग

  • एकाच ठिकाणी अनेक बांधकाम प्रकल्पांची माहिती मिळणार

  • वन बीएचकेपासून थ्री, फोर बीएचकेपर्यंतच्या घरांची माहिती मिळणार

  • घराबाबतच्या शंकांचे समाधान करण्यासाठी तज्ज्ञांची व्याख्याने

काय? कधी? कुठे? केव्हा?

  • काय? : ‘सकाळ’ वास्तू एक्स्पो २०२३

  • कुठे? : ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर, चिंचवड

  • कधी? : शनिवार व रविवारी अर्थात १५ व १६ एप्रिल २०२३

  • केव्हा? : सकाळी ११ ते रात्री ८ (दोन्ही दिवस)

प्रवेश व पार्किंग : विनामूल्य

संपर्क : ९८८१७१८८४०

पिंपळकर यांचे आज व्याख्यान

‘सकाळ वास्तू एक्स्पो’निमित्त शनिवारी (ता. १५) सायंकाळी पाच वाजता ज्येष्ठ वास्तुविशारद आनंद पिंपळकर यांचे ऑटोक्लस्टर सभागृहात व्याख्यान होईल. वास्तुशास्त्र काय आहे?, जमिनीवरच्या वास्तूचे नियम फ्लॅटच्या वास्तूला लागू पडतात का?, विना तोडफोड करता फ्लॅटची वास्तू वास्तुशास्त्राप्रमाणे संतुलित करता येते का?, फ्लॅटला ब्रह्म वास्तू काढायची असते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ‘आनंदी वास्तू’ विषयावरील व्याख्यानातून मिळणार आहेत. फ्लॅटचे वास्तुशास्त्र समज-गैरसमजाबाबत प्रश्नोत्तरेही होणार आहेत. व्याख्यानासाठी प्रवेश विनामूल्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.