Sakal Vastu Property Expo : घर घेताय! चिखलीत या अन्‌ बुकिंग करा...

तुमच्यासाठी भाडेतत्त्वावरील घरातून स्वतःच्या हक्काच्या घरात जाऊ इच्छिणाऱ्या कुटुंबांसाठी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ‘सकाळ वास्तू एक्सो’चे शनिवारी (ता. २८) आणि रविवारी (ता. २९) आयोजन करण्यात आले आहे.
Sakal Vastu Property Expo 2023
Sakal Vastu Property Expo 2023sakal
Updated on

पिंपरी - स्वतःचं, मनासारखं आणि ‘बजेट’मधील घर शोधतायं? मग, आता चिंता करू नका! कारण, तुमच्यासाठी आणि भाडेतत्त्वावरील घरातून स्वतःच्या हक्काच्या घरात जाऊ इच्छिणाऱ्या कुटुंबांसाठी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ‘सकाळ वास्तू एक्सो’चे शनिवारी (ता. २८) आणि रविवारी (ता. २९) आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा, आता वेळ दवडू नका. येत्या ‘वीकेंड’ला ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ला भेट देऊन तुमच्या स्वप्नातील घराचे जरूर ‘बुकिंग’ करा!

रस्त्यांचे जाळे, कनेक्टिव्हिटी, दळणवळणाची सुविधा, पाणी पुरवठ्याची सोय, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन आणि निसर्गसंपन्न आल्हाददायक अशा वातावरणात घर घेण्याची संधी ‘सकाळ वास्तू एक्स्पो’च्या निमित्ताने नागरिकांना मिळणार आहे.

एकाच छताखाली अनेक गृहप्रकल्पांची माहिती नागरिकांना उपलब्ध होणार असून दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर घर घेण्याची संधी मिळणार आहे. स्वतःचं, मनासारखं व ‘बजेट’मधील घर शोधण्यासाठी अनेकजणांना पुरेसा वेळ मिळत नाही. किंवा वेळ मिळाला तरी त्यांच्यासमोर घर निवडीचे निरनिराळे उत्तमोत्तम पर्याय उपलब्ध होत नाहीत. बाजारात घरांच्या किंमतींची नीट अशी माहिती कळत नाही.

या सर्व अडचणी ओळखून तुमच्यासाठी चिखलीतील सीझन बॅंक्वेट हॉलमध्ये ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ हे गृहप्रकल्प विषयक प्रदर्शन भरविण्यात येत आहे. त्यामध्ये, उद्योगनगरीतील पंचवीसहून अधिक विकसकांचे मोशी, चऱ्होली, चिखली, भोसरी, डुडुळगाव, दिघी, भोसरी आणि आळंदी परिसरातील शंभरहून अधिक प्रकल्पांमधील घरांचे पर्याय ग्राहकांना पाहता येतील. तेव्हा, आपल्या स्वप्नातील व मनातील घर बुक करण्यासाठी आजच निश्चय करा आणि घराचा मुहूर्त साधा.

Sakal Vastu Property Expo 2023
Fataka Stall : फटाके स्टॉलसाठी ऑनलाइन निविदा

‘एक्स्पो’त काय?

  • शहर परिसरातील मोठमोठ्या बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग

  • एकाच ठिकाणी अनेक बांधकाम प्रकल्पांची माहिती मिळणार

  • वन बीएचकेपासून थ्री बीएचकेपर्यंत क्षेत्र असलेल्या घरांची माहिती मिळणार

  • मनासारख्या ठिकाणी मनासारखं घर निवडण्याची एकाच ठिकाणी संधी

काय? कधी? कुठे? केव्हा?

काय? : ‘सकाळ वास्तू एक्स्पो’

कुठे? : सीझन बॅक्वेट हॉल, सीटी प्राइड स्कूलजवळ, देहू-आळंदी रस्ता, चिखली

कधी? : शनिवार व रविवार अर्थात २८ व २९ ऑक्टोबर २०२३

केव्हा? : सकाळी ११ ते रात्री ८ (दोन्ही दिवस)

प्रवेश व पार्किंग : विनामूल्य

संपर्क : ९८८१७१८८४०, ८३८००७४८२३

चिखली, मोशी परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. भविष्याचा विचार केल्यास सर्वाधिक डेव्हलपमेंट याच भागात होणार आहे. त्यामुळे, राहण्यासाठी आणि गुंतवणूक म्हणूनही अनेक जण येथील घरांना प्राधान्य देत आहेत. सर्वाधिक ॲमिनिटीज आम्ही दिल्या आहेत. २ बीएचकेपासून ५ बीएचकेपर्यंतची घरे आमच्याकडे उपलब्ध आहेत.

- संतोष बारणे, संचालक, सिल्‍व्हर गार्डनिया

आमचा प्रकल्प महामार्गापासून अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर आहे. नियोजित डिअर सफारी पार्कपासून अवघ्या पाचशे मीटरवर आहे. ‘रेरा’नुसार २०२४ अखेरपर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे; पण येत्या दोन महिन्यांतच नागरिकांना घराचा ताबा देण्याचे नियोजन आहे.

- गंगाधर भालेकर, संचालक, सिद्धी कन्स्ट्रक्शन

चऱ्होली खूप वेगाने विकसित होत आहे. आमचा प्रकल्प मुख्य चौकात आहे. तिथे विमानतळ रस्ता, मरकळ रस्ता एकत्र येतात. त्यामुळे, या भागाला अधिक पसंती आहे. महापालिकेचे एक लाख चौरस फुटांचे क्रीडा संकुल आमच्या प्रकल्पालगत आहे. आपण डायनिंग एरिया स्वतंत्र देत आहोत. ३८८ फ्लॅट आहेत. सर्व फ्लॅटमध्ये नैसर्गिक प्रकाश येईल, असे बांधकाम आहे.

- अमित छाजेड, व्हाइस प्रेसिडेंट, लोटस प्रॉपर्टीज

चिखली, चऱ्हो‍ली परिसरातील रिअल इस्टेट उद्योगात विलक्षण परिवर्तन होत आहे. ‘सकाळ’ने वास्तू एक्स्पो आयोजित करून सणासुदीच्या अनुषंगाने घर घेण्याची चांगली संधी दिली आहे. एस.बी.पाटील ग्रुप उत्तमोत्तम सेवा ग्राहकांना देत आहे. उत्कृष्ट प्रकल्प, आकर्षक ऑफर, सवलती उपलब्ध असतील.

- गणेश पाटील, संचालक, एस. बी. पाटील ग्रुप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.