Sakal Vidya : करिअरबाबत रविवारी चर्चासत्र; तज्ज्ञांचे मिळणार मार्गदर्शन

पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणानंतर प्रशिक्षण आणि प्लेसमेंटच्या संधी कुठे आहेत? दहावी आणि बारावीनंतर करिअरच्या संधी कोणत्या आहेत?
sakal vidya
Sakal-Vidyasakal
Updated on

पिंपरी - पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणानंतर प्रशिक्षण आणि प्लेसमेंटच्या संधी कुठे आहेत? दहावी आणि बारावीनंतर करिअरच्या संधी कोणत्या आहेत? अकरावी प्रवेशासाठी प्रवेश अर्ज कसा भरायचा? विविध अभ्यासक्रमांसाठी केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया आणि प्रवेश प्रक्रियेविषयी विद्यार्थी व पालकांना अनेक शंका, प्रश्‍न भेडसावत असतात.

त्याचे उत्तर देण्यासाठी ‘सकाळ विद्या’ आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व पिंपरी चिंचवड विद्यापीठ यांच्यातर्फे रविवारी (ता. २३) विनामूल्य चर्चासत्राचे आयोजन केले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळणार आहे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी नऊला या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. यात सीईटी (CET) असो JEE (Mains), वा JEE (Advanced) असो या परीक्षांविषयीच्या सर्वच शंकांचे निरसन होणार आहे.

बऱ्याचदा गुणवत्ता असूनही केवळ योग्य मार्गदर्शनाचा अभाव, चुकीचे अभ्यासतंत्र व नियोजन यामुळे वर्षभर अभ्यास करूनही विद्यार्थी मागे पडतात. यानुसार अभ्यासाचे तंत्र व योग्य गुरूचे मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते. त्यासाठीच्या सीईटी, नीट, जेईई यासारख्या राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षांचा पाया कसा भक्कम करता येईल आणि अवघड वाटणाऱ्या या परीक्षांवर प्रभुत्व कसे मिळविता येईल, यासाठी योग्य मार्गदर्शन आवश्‍यक असते.

म्हणूनच विद्यार्थ्याला विषयातील मूलभूत संकल्पना स्पष्ट असतील, तरच अवघड अभ्यास सोपा होतो. पाठांतरापेक्षा संकल्पना समजून घेण्यावर भर दिला पाहिजे. राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांवर प्रभुत्व कसे मिळवता येईल याकरिता ‘सकाळ विद्या’ आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व पिंपरी चिंचवड विद्यापीठ संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे आयोजन केले आहे.

या चर्चासत्रात ‘दहावी व बारावीनंतरचे करिअर’ या विषयावर विवेक वेलणकर, ‘बारावीनंतर खासगी विद्यापीठांमधील शिक्षणाच्या संधी’ यावर डॉ. सुदीप थेपडे आणि ‘पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणानंतर प्रशिक्षण आणि प्लेसमेंटच्या संधी’ यावर डॉ. शीतलकुमार रवंदळे तर कॅप राऊंडस आणि प्रवेश प्रक्रिया याची माहिती डॉ. केतन देसले सांगणार आहेत.

याविषयी मिळणार मार्गदर्शन

  • सीईटी/जेईईच्या पर्सेन्टाईलनुसार ऑप्शन फॉर्म कसा भरावा.

  • ‘पीसीएम’मध्ये ४५ टक्क्यांपेक्षा कमी गुण असल्यास उपलब्ध पर्याय

  • मागील वर्षाचे कॉलेजचे कटऑफ, शैक्षणिक कर्ज व स्कॉलरशिप बद्दलची माहिती

  • बी. व्होकेशनल कोर्स तसेच वर्किंग प्रोफेशनल्ससाठीच्या कोर्सेसबद्दलची माहिती

  • डिप्लोमानंतर इंजिनिअरिंगची दुसऱ्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया

  • प्रवेशाच्या फेऱ्या किती व कशा होणार?

चर्चासत्राविषयी...

  • कधी : रविवारी, २३ जून २०२४

  • केव्हा : सकाळी ९ वा.

  • कुठे : प्रा. रामकृष्ण मोरे, प्रेक्षागृह, चिंचवड

  • वक्ते : विवेक वेलणकर, डॉ. शीतलकुमार रवंदळे, डॉ. सुदीप थेपडे, डॉ. केतन देसले

  • प्रवेश : विद्यार्थी व पालकांसाठी विनामूल्य

अधिक माहितीसाठी संपर्क :

अमोल ८३७८९८७८३६ आणि सचिन ९७३०९५९६९९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.