देहू - संत तुकाराम महाराज संस्थान - जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज सोहळा येत्या 30 मार्च रोजी आहे. परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीज सोहळा शासनाच्या आदेशानुसार 50 भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व वारकरी आणि दिंडीकरांनी यांची नोंद घ्यावी. येत्या 30 तारखेला होणाऱ्या बीज सोहळ्यास कोणीही देहूत येवू नये, असे आवाहन संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने शनिवारी (ता. 20) प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे. संत तुकाराम महाराज यांचा 373 वा सदेह वैकुंठगमन सोहळा म्हणजे बीज सोहळा येत्या 30 मार्चला आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी केवळ 50 नागरिकांच्या उपस्थितीत सोहळा साजरा करावा, असा आदेश काढला आहे. त्यामुळे संस्थानेही वारकरी आणि भाविकांना सोहळ्यास न येण्याचे आवाहन केले आहे. तसेच, हा सोहळा गाथा पारायण करून घरीच साजरा कऱण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे बीज सोहळ्यानंतर 31 मार्चला पालखी सोहळ्यानिमित्त दिंड्यावाल्यांची बैठकही स्थगित करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. बैठकीची तारीख नंतर कळविण्यात येणार आहे. संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे यांची पत्रावर स्वाक्षरी आहे.
Edited By - Prashant Patil
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.