Palkhi Sohala : पालखीच्या स्वागतास सजली उद्योगनगरी; महापालिका, पोलिस प्रशासनाकडून नियोजन पूर्ण

पुणे-मुंबई महामार्गावरील हातगाड्या, पथारीवाल्यांना निर्बंध केले आहेत. मांस व मासे विक्रेत्यांना पुढील चार दिवस दुकाने बंद ठेवण्यास सांगितले आहे.
PCMC Preaparation complete
PCMC Preaparation completesakal
Updated on

पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावरील हातगाड्या, पथारीवाल्यांना निर्बंध केले आहेत. मांस व मासे विक्रेत्यांना पुढील चार दिवस दुकाने बंद ठेवण्यास सांगितले आहे. निगडीतील भक्ती-शक्ती चौकात स्वागत कक्ष उभारला आहे.

आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामाची आणि खराळवाडीतील विठ्ठल मंदिरात विसाव्याची व्यवस्था केली आहे. महापालिका अग्निशामक दलाचा एक बंब, पाण्याचे टॅंकर सज्ज आहेत. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत, पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. फिरते स्वच्छतागृह ठिकठिकाणी ठेवले आहेत. शहर स्वच्छतेवर भर दिला आहे, ही सर्व तयारी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या आगमनानिमित्त महापालिका व पोलिस प्रशासनासह उद्योगनगरीतील भाविकांनी केली आहे.

PCMC Preaparation complete
SSC Student : दहावीनंतर काय? आजच जाणून घ्या चर्चासत्रात!

आषाढी वारीनिमित्त देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शनिवारी (ता. १०) आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रविवारी (ता. ११) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. तुकोबारायांचा पालखी सोहळा रविवारी आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी राहणार आहे. त्यापूर्वी निगडीतील भक्ती-शक्ती चौकात महापालिकेतर्फे सोहळ्याचे स्वागत केले जाणार आहे.

सोमवारी (ता. १२) सकाळी सोहळा पुण्यातील मुक्कामाकडे मुंबई-पुणे महामार्गाने मार्गस्थ होणार आहे. त्या दरम्यान, खराळवाडीतील विठ्ठल मंदिरात सकाळचा विसावा आणि दापोडीतील हॅरिस पुलाजवळ दुपारची विश्रांती होणार आहे. तसेच, सोमवारीच संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा चोविसावाडी, वडमुखवाडी, दिघी, बोपखेल फाटा मार्गे पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे.

PCMC Preaparation complete
Sant Tukaram Maharaj : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान

सकाळचा विसावा वडमुखवाडीतील थोरल्या पादुका मंदिरात असेल. दिघी मॅगझीन कॉर्नर येथे महापालिकेतर्फे पालखी सोहळ्याचे स्वागत केले जाणार आहे. शिवाय, सुदुंबरे येथून प्रस्थान ठेवलेले संताजी महाराज जगनाडे आणि संत गवरशेठ वाणी पालखी सोहळेही अनुक्रमे चिंचवड स्टेशन आणि आकुर्डी स्टेशन परिसरात मुक्कामी राहणार आहेत. या चारही पालखी सोहळ्यामध्ये सहभागी दिंड्या व वारकरी शहरातील विविध ठिकाणी मुक्कामी राहणार आहेत. त्यांची व्यवस्था सामाजिक संस्था, संघटना व महापालिकेने केली आहे. त्यामुळे आतापासूनच शहरातील वातावरण वारीमय झाले आहे.

मांस विक्रीच्या दुकानांवर निर्बंध

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळे अनुक्रमे मुंबई-पुणे महामार्ग आणि आळंदी-पुणे रस्त्याने पंढरपूरकडे जाणार आहेत. दोन्ही सोहळे सोमवारी (ता. १२) पुण्यात पोहोचणार आहेत. त्यामुळे शहरातील वातावरण भक्तीमय राहणार आहे. या काळात वारकरी संप्रदायाचे पावित्र्य राखण्यासाठी शहरातील मांस व मासे विक्रीचे व मांसाहारी खाद्य पदार्थांची दुकाने बंद ठेवावेत, अशी दुकाने खुली दिसल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.