महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवारी(ता. १२) मुख्य शिष्यवृत्ती परीक्षा होत आहे. त्याचा सराव होण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने येत्या रविवारी (ता.५) सराव परीक्षेचे नियोजन केले आहे.
पिंपरी - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवारी (ता. १२) मुख्य शिष्यवृत्ती परीक्षा होत आहे. त्याचा सराव होण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने येत्या रविवारी (ता.५) सराव परीक्षेचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे यंदा मुख्य परीक्षेच्या वेळापत्रकानुसारच ही परीक्षा होणार आहे, अशी माहिती शिष्यवृत्ती समन्वयक सुभाष सूर्यवंशी यांनी दिली.
या परीक्षेस शहरातील पाचवीचे ७ हजार २२५ तर आठवीचे ४ हजार ७८१ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले आहेत. पाचवीसाठी ४३ परीक्षा केंद्रावर तर आठवीसाठी २९ परीक्षा केंद्राची व्यवस्था केली आहे. मुख्य परीक्षेपूर्वी महापालिका व खासगी सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा मुख्य परीक्षेच्या परीक्षा केंद्रावरच होणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी ९ वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. परीक्षेला येताना विद्यार्थ्यांना हॉल तिकीट आणणे अनिवार्य आहे.
सराव परीक्षेची तयारी झाली असून, ७२ केंद्रसंचालक, ६ सहकेंद्रसंचालक, ६३०पर्यवेक्षक, २१५ शिपाई यांची परीक्षा घेण्यासाठी नियुक्ती केली आहे. सकाळी ११ के १२.३० यावेळेत प्रथम भाषा व गणित आणि १.३० ते ३ या वेळेत बुद्धीमत्ता चाचणी आणि तृतीय भाषा असे पेपर होणार आहेत. या परीक्षे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून १२ फिरती तपासणी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे केंद्रसंचालक, पर्यवेक्षक, फिरते तपासणी पथक यांचे आदेश पारित केले आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या puppss.mscescholarshipexam.in या website वर विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट शाळेच्या लॉगिन वर उपलब्ध करण्यात आले असून दोन्ही परीक्षेसाठी हॉलतिकिट विद्यार्थ्यांकडे असणे अनिवार्य आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.