Accident : बीआरटी मार्गात स्कूल बस-मोटारीची धडक; मोटारचालकासह दोन विद्यार्थी जखमी

बीआरटी मार्गिकेतून जाणाऱ्या स्कूल बस व आलिशान मोटारीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात मोटारचालकासह बसमधील दोन विद्यार्थी जखमी झाले.
Accident
Accidentesakal
Updated on

पिंपरी - बीआरटी मार्गिकेतून जाणाऱ्या स्कूल बस व आलिशान मोटारीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात मोटारचालकासह बसमधील दोन विद्यार्थी जखमी झाले. ही घटना सोमवारी (ता. २९) दुपारी चिंचवडमधील ऑटो क्लस्टरजवळ घडली.

यश अरुण मित्तल (वय-२९, रा. निगडी) असे मोटार चालकाचे नाव आहे तर योगेश एकनाथ घोडके (वय-३०, रा. आळंदी रोड, आळंदी) असे स्कूलबस चालकाचे नाव आहे. पोदार इंटरनॅशनल या शाळेची बस भोसरीवरून चिंचवड येथे जात होती तर यश मित्तल हा त्याच्या ताब्यातील मोटार घेऊन ऑटो क्लस्टर येथील बीआरटी मार्गातून भरधाव जात होता. त्याचवेळी स्कूलबस बीआरटी मार्गातून समोरून आली.

यावेळी मोटार व स्कूल बसची समोरासमोर जोरात झाली. यामध्ये मोटार चालक व दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. अपघातावेळी स्कूलबसमध्ये १५ विद्यार्थी होते. त्यातील दोन विद्यार्थी जखमी झाले. विद्यार्थ्यांना सुखरूपपणे बसमधून बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर बीआरटी मार्गाच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली. त्यामुळे वाहतूककोंडी झाली. दरम्यान, अपघातस्थळी विद्यार्थ्यांच्या पालकांनीही गर्दी केली. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

‘या अपघातात दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. पालकांनी घाबरू नये. बसमधील सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत.

- एस. जे. फ्रँकलिन, सरव्यवस्थापक पोदार ग्रुप ऑफ स्कूल, पुणे विभाग.

‘बसचा अपघात झाल्याने आम्ही घाबरलो होतो. मात्र, आमचा मुलगा सुरक्षित आहे. त्याला घरी घेऊन आलो.

- एक पालक.

बीआरटी मार्गिकेत घुसखोरी

बीआरटी मार्गिकेत खासगी वाहनांना प्रवेश मनाई आहे. तरीही, अनेक वाहनचालक यामध्ये वाहन घुसवतात. अशातच सोमवारी ही घटना घडली. दोन्ही वाहने बीआरटी मार्गिकेतून धावत होती. अपघातांबाबतची माहिती मिळाल्यानंतर पालकांनी घटनास्थळी धाव घेतली. आपल्या पाल्याची प्रकृती कशी आहे, याबाबत ते चौकशी करत होते.

शाळेची बस असल्याने आम्ही विश्वासाने आम्ही आमच्या पाल्यांना सोडत असतो. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी शाळेची आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शाळेने बस चालकांना योग्य त्या सूचना देणे आवश्यक आहे.

- राजरत्न जाधव, पालक.

या अपघातात मोटार चालक व दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. स्कूलबस चालक व मोटार चालक या दोघांचीही वैद्यकीय तपासणी केली असून, रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. दरम्यान, या दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

- सचिन हिरे, सहायक पोलिस आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.