School Equipment : यंदा पालकांच्या खिशाला झळ! शालेय साहित्याच्या किमतीत वीस टक्क्यांनी वाढ

नवीन शैक्षणिक वर्षाला शनिवारपासून सुरुवात होणार असल्याने शालेय साहित्यांनी बाजारपेठ गजबजली आहे. यंदा साहित्य खरेदी केले जाणार असल्याने बाजारात गर्दी आहे.
school equipment
school equipmentsakal
Updated on

पिंपरी - नवीन शैक्षणिक वर्षाला शनिवारपासून सुरुवात होणार असल्याने शालेय साहित्यांनी बाजारपेठ गजबजली आहे. यंदा साहित्य खरेदी केले जाणार असल्याने बाजारात गर्दी आहे. दरम्यान यंदा सर्व प्रकारच्या साहित्याच्या किमतीत सरासरी वीस टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे पालकांच्या खिशाला झळ बसत आहे.

पिंपरी कॅंम्‍प या स्थानिक बाजारपेठेत शालेय साहित्याचे विक्रेते आहेत. गेल्यावर्षी दीडशे रुपये डझन असणाऱ्या वह्या आता दोनशे रुपयांवर गेल्या आहेत. तसेच पाच रुपयांना मिळणारा साधा पेन आता सात रुपयांना मिळत आहे तर दोनशे रुपयांचे दप्तर देखील २६० रुपयांना झाले आहे. शुक्रवारी बाजारात साहित्य खरेदीसाठी गर्दी दिसून आली.

इंधनाचे वाढलेले दर, कागद टंचाई याचा शालेय साहित्य दरवाढीवर परिणाम झाला आहे. पेन्सिलपासून लाँगबुकपर्यंत सर्वच साहित्याच्या किमती वाढल्याने पालकांचे शैक्षणिक बजेट कोलमडले आहे. ज्या पालकांना दोन किंवा त्यापेक्षा अधिक मुले आहेत, त्यांचा या वर्षीचा खर्च वाढणार आहे.

तीन रुपयांची पेन्सिल पाच ते सात रुपयांना!

तीन रुपयाची साधी पेन्सिल पात ते सात रुपयांना तर दहा रुपयांचे पेन १५ रुपयांवर पोहचले आहे. वह्यांच्या किमती डझनामागे ६० ते १०० रुपयांनी वाढल्या आहे. नामांकित कंपन्यांच्या वह्यांच्या दरात वीस टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. लहान वह्यांच्या किमतीत डझनला ६० रुपयांची वाढ झाली आहे. याशिवाय कंपास आणि कंपास साहित्य १५ टक्क्यांनी तर विद्यार्थ्यांच्या दप्तरचे भाव १५ टक्क्यांनी वाढले आहेत.

स्‍कूल बँग व टिफिनचे शेकडो प्रकार दुकानात उपलब्ध असल्याने त्यांची खरेदीही वाढली आहे. महागाईची झळ आता शाळेपर्यंत पोहोचली असली तरीही शैक्षणिक साहित्य गरजेचे असल्याने पालकांना ते खरेदी करावेच लागत असल्याचे पालक योगेश पाटील यांनी सांगितले. यामुळे पालकांना यंदा साहित्य खरेदी करताना महागाईची झळ सोसावी लागत आहे.

कागद, शाईसह वाहतूक महागल्याने भाववाढ

जगभरात कागद, शाई, स्टीलचे भाव वाढले आहेत. याचा परिणाम शालेय साहित्यावर पडला असून वह्या, नवनीतसह इतर कंपन्यांचे प्रिंटेड स्टेशनरी यांचे भाव २५ ते ३० टक्क्यांनी महागले आहे. वाहतूक खर्च, पेपरच्या वाढलेल्या किमतीमुळे शैक्षणिक साहित्य महागले आहे, असे विक्रेता विनय सिंग यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com