सोमेश्वरनगर - ‘एकाही पानावर डंख नाही, स्पॉट नाही आणि करपाही दिसत नाही. छाटणीची पद्धतही चांगली आहे. अंजिराची बाग एकदम हेल्दी आहे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अंजिराच्या बागेचे कौतुक केले. पवार यांनी सव्वा तास अंजिराच्या बागेत घालविला. अख्खे कुटुंब बागेत राबते, याचे कौतुक करत अन्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा, असा सल्लाही त्यांनी दिला.
निंबुतनजीक जगतापवस्ती (ता. बारामती) येथील दीपक विनायक जगताप यांनी डोंगर फोडून साडेसहा एकरवर अंजिराची बाग केली आहे. जगताप यांना सासवडमध्ये पवार यांच्याच हस्ते अखिल महाराष्ट्र अंजीररत्न पुरस्कार मिळाला होता. पुरंदर ही अंजिराची खाण असताना बारामतीत अंजीर आले कसे, असे कुतूहल पवार यांनी त्यावेळी व्यक्त केले होते. जगतापांनी मग पवारांना अंजिरांची भेट दिली होती. दरम्यान रोहन सतीश उरसळ काही दिवसांपूर्वी या बागेची पवार यांना छायाचित्रे पाठविली. यामुळे ऐन दिवाळीच्या धामधुमीत पवार यांनी बंधू प्रतापराव पवार यांच्यासह जगताप यांच्या अंजीर बागेस भेट दिली.
भेटीप्रसंगी पवार यांचे सहकारी बी. जी. काकडे, संभाजी होळकर, पुरुषोत्तम जगताप, राजवर्धन शिंदे, प्रमोद काकडे, रोहन उरसळ, अभिजित काकडे, ऋषीकेश गायकवाड, महेश काकडे, कांचन निगडे उपस्थित होते. बागेच्या निरोगीपणाचे रहस्य पवार यांनी विचारल्यावर, रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा समतोल करतो, शिवाय जीवामृतही देतो अशी माहिती दीपक जगताप यांनी दिली. अंजीरच का लावलं, कसं वाढवलं, फळांची संख्या इतकी कशी मिळविली, या प्रश्नांवर जगताप यांनी चुकांमधून शिकत गेल्याचे सांगितले. संत्रा, डाळिंब, मोसंबी, अंजीर या चारही फळांची एकरभर लागवड करून त्यात अंजीर चांगली करू शकतो, असा अभ्यास केल्याचे जगताप यांनी सांगितले. एकेका फांदीवर तीस-चाळीस फळे पाहून पवार यांनी बाग हेल्दी असल्याचे प्रशस्तिपत्र दिले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.