पिंपरी - अवघा एक वर्ष ९ महिन्याचा चिमुरडा खडखड देशांची नावे (Ciountry Name) सांगतो, चवी ओळखतो, विविध भाज्या, पक्षी, गाड्यांची नावे तो पटापट बोलतो, बाराखडी, एबीसीडी त्याची तोंडपाठ आहे. रामायणातील पात्रे म्हणून दाखवतो. त्याच्या या हुशारीमुळे कुटुंबीयही हरखून गेले आहेत. अगदी अल्पावधीत त्याची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स २०२१’ (India Book Of Recodrs 2021) मध्ये झाली असून त्याला सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले आहे.
रहाटणीतील नखाते वस्ती, निसर्ग सोसायटीमध्ये राहणारे बिंगेवार कुटुंब. शार्विल बिंगेवार या चिमुकल्याचा जन्म १ ऑक्टोबर २०१९चा आहे. लहानपणापासूनच शार्विल तल्लख बुद्धीचा असल्याने चटकन कोणतीही गोष्ट तो लक्षात ठेवतो. घरातील पुस्तके व टिव्ही पाहून प्रत्येक पात्रांची नावे तो लक्षात ठेवत होता. तेव्हापासून त्याची रुची घरच्यांना समजली. पालकांनाही या गोष्टीचा हुरुप वाटला आणि हळूहळू त्यांनी ऑनलाइन अभ्यास करुन अधिकाधिक प्रमाणात शार्विल कसा पारंगत होवू शकतो याकडे लक्ष वेधलं. शार्विलची आई पद्मावती बिंगेवार यांनी त्याचा सराव करुन घेतला. स्पर्धेची माहिती घेतली आणि त्यासाठी नोंदणी केली.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ४ ऑगस्टला त्याची निवड झाल्याचे घेषित करण्यात आले. १३ ऑगस्टला प्रमाणपत्रासाठी नामांकन मिळाले. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या २०२२ मधील पुस्तकात शार्विलच्या उपक्रमाची नोंद होइल. यापुढे शार्विलला वाहतूक चिन्हे शिकवण्याचा आईचा प्रयत्न आहे. नागरिकांनाही काही बाबी समजत नाहीत. परंतु, सर्वसामान्यांच्या बुद्धीपेक्षाही तो अधिक वेगाने सर्व गोष्टी आत्मसात करतो, पुढील स्पर्धेसाठी त्याला उतरवण्याचा कुटुंबीयांचा मानस आहे.
दीड वर्षाचा असल्यापासून हळूहळू त्याला प्रत्येक गोष्टी शिकवायला सुरुवात केली. कुटुंबीयांची सर्वांची मेहनत आहे. त्याचा उत्साह पाहून खरंच आम्ही हे करु शकलो. तो खेळत असतानाही या सर्व गोष्टी सहजपणे आत्मसात करतो. कोरोनामुळे ऑनलाइन स्पर्धेसाठी नोंदणी केली व सर्व माहिती देखील ऑनलाइन पाठवली. शुक्रवारी आम्हाला त्यांचे पत्र मिळाले. सर्वांना खूप आनंद झाला.
- विजय बिंगेवार, शार्विलचे वडील, रहाटणी
शार्विल काय काय सांगतो...
२१ फळे, ९० प्रसिद्ध व्यक्ती, ३३ प्राणी, १२ पक्षी, १९ गाड्या, हिंदी वर्णमाला, १२ विविध आकार, २१ फळे, २७ राज्य व देशांची राजधानी, १ ते १० तेलगू अंक, १ ते २५ मराठी अंक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.