छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १० मार्च रोजी शिलाटणे येथील युवक शिवज्योत आणण्यासाठी मल्हारगड, ता. पुरंदर येथे गेले होते.
लोणावळा - शिलाटणे येथील जखमी शिवभक्तांपैकी १२ वर्षीय शिवभक्ताचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आर्यन सोमनाथ कोंडभर (वय-१२) असे मृत्यू झालेल्या शिवभक्ताचे नाव आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १० मार्च रोजी शिलाटणे येथील युवक शिवज्योत आणण्यासाठी मल्हारगड, ता. पुरंदर येथे गेले होते. शिवज्योत घेऊन परतत असताना ताथवडे येथे पहाटे साडेचार वाजता पाठीमागून आलेल्या भरधाव मालवाहू ट्रकने पायी चाललेल्या शिवभक्तांना आणि त्यांच्या वाहनांना जोरदार धडक दिली होती.
या अपघातात आर्यनसह शिवज्योत घेऊन येणारे तेहतीस युवक जखमी झाले होते. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर होती. जखमी आर्यनवर रावेत येथील ओजस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्याच्या मेंदूला मार लागला लागला होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अखेर आठवडाभर सुरू असलेली त्याची मृत्यूशी झुंज अखेर संपली. गुरुवारी त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे शिलाटणे गावावर शोककळा पसरली असून शिवभक्तांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दोघांची प्रकृती अद्याप गंभीर
या दुर्दैवी अपघातात शिलाटणे गावातील तेहतीस शिवभक्त युवक जखमी झाले होते. यात अल्पवयीन मुलांचा भरणा अधिक होता. जखमींपैकी दोन युवकांची प्रकृती अद्याप गंभीर असून सर्व जखमींची प्रकृती सुधारावी यासाठी ग्रामस्थांनी देव पाण्यात ठेवले आहे. सहा जणांना उपचार करत घरी डिस्चार्ग देण्यात आला. तर पंधरा युवक जायबंदी झाले आहेत.
आर्यन शाळेतील हुशार विद्यार्थी
आर्यन हा कार्ला येथील श्री दुर्गा परमेश्वरी विद्यानिकेतन विद्यालयात इयत्ता सहावीत शिकत होता. शाळेतर्फे घेण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये आर्यन याने प्रदूषण नियंत्रणावर प्रकल्प सादर केला होता. या प्रकल्पाचे मोठ्याप्रमाणावर कौतुक झाले होते अशी माहिती शाळेच्या वतीने देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.