शिवसेनेचा महापालिकेत ‘आव्वाज’

स्थायी समिती बरखास्तीची मागणी; जोरदार घोषणाबाजी
shivsena
shivsenasakal
Updated on

पिंपरी : ‘चोर भाजप, दरोडेखोर भाजप’, ‘लूटमार नही चलेगी, नही चलेगी’, ‘बरखास्त करा, बरखास्त करा, महापालिका स्थायी समिती बरखास्त करा’, ‘भ्रष्ट भाजपचे करायचे काय, खाली डोकं वर पाय’, ‘करदात्या नागरिकांच्या पैशावर दरोडा टाकणाऱ्या भाजप नगरसेवकांचा धिक्कार असो’, ‘पैसे नागरिकांच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’... अशा घोषणा देत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. २०) महापालिका परिसर दणाणून सोडला.

shivsena
ठेकेदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी विरोधकांकडून भाजपवर टिकास्त्र

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी स्थायी समिती कक्षात छापा टाकला. यात ठेकेदाराकडून लाच घेताना समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांचा स्वीय सहाय्यक ज्ञानेश्‍वर पिंगळे याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर लांडगे व पिंगळे यांच्यासह पाच जणांना अटक केली. या लाच प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेनेने महापालिका प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. खासदार श्रीरंग बारणे, महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहरप्रमुख नगरसेवक सचिन भोसले, उपजिल्हा प्रमुख नीलेश मुटके, सहसंपर्क प्रमुख योगेश बाबर, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, अनंत कोऱ्हाळे, धनंजय आल्हाट, मधुकर बाबर, सचिन सानप, सरिता साने, अनिता तुतारे आदी आंदोलनात सहभागी झाले होते. महापालिकेची सर्वसाधारण सभा दुपारी दोन वाजता होती. त्यासाठी येणाऱ्या एकेका भाजप नगरसेवकाकडे पाहत आंदोलक आणखी आक्रमक होवून घोषणाबाजी करत होते.

shivsena
पिंपरीत खासगी ट्रॅव्हल्समधून अवैध वाहतूक

आंदोलनानंतर खासदार बारणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली. निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचारात लक्ष घालावे, भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी, अशा मागण्या केल्या. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्र पाठविले असल्याचे त्यांनी सांगितले. लाच प्रकरण हे शहरासाठी अतिशय निंदनीय घटना आहे. भारतीय जनता पार्टी ही भ्रष्टाचारी पार्टी आहे. गेल्या चार वर्षांपासून त्यांनी लूट चालवली आहे. त्यांच्यावर कारवाई झाली आहे. स्थायी समिती बरखास्त करून नवीन सदस्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले यांनी केली. योगेश बाबर यांनीही भाजपच्या साडेचार वर्षातील कारभाराच्या चौकशीची मागणी केली.

shivsena
पिंपरी : टाक्यांच्या परिसरात सुरक्षा रक्षक नेमवा

भाजपने जनतेचा विश्‍वासघात केला : बारणे

महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या सत्तातूर टोळीमुळे भाजप बदनाम झाले आहे. भ्रष्टाचार करून तुंबड्या भरणे, हा एकमेव कार्यक्रम राबविणाऱ्या टोळीने नाकीनऊ आणले आहे. महापालिकेला भ्रष्टाचाराच्या खाईत लोटले आहे. जनतेचा विश्‍वासघात केला आहे, असा आरोप खासदार श्रीरंग बारणे यांनी केला. ते म्हणाले, ‘‘लुटारुंच्या टोळीने कोरोना काळातही भ्रष्टाचार करणे सोडलेले नाही. मागील साडेचार वर्षात भाजपने भ्रष्टाचाराचा कळस केला. यामुळे भाजपचे मूळ व जुने कार्यकर्ते, नेत्यांना वेदना होत असतील, मात्र ते हतबल आहेत. लाचप्रकरणी लोकप्रतिनिधीला अटक केली. महापालिकेत राजरोसपणे चाललेल्या भ्रष्टाचाराचा हा मोठा पुरावा आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.