मोशी येथे मानाच्या विड्याची बोली लागली तब्बल 91 लाख रुपयांना

संपूर्ण महाराष्ट्रात मानाच्या विड्याच्या लिलावासाठी लाखोंची बोली लावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या श्री नागेश्वर महाराज भंडारा उत्सवातील लिलावामध्ये या वर्षीचा मानाच्या विड्याला तब्बल 91 लाख रुपयांची बोली लावली गेली.
Ganesh Kudale
Ganesh KudaleSakal
Updated on
Summary

संपूर्ण महाराष्ट्रात मानाच्या विड्याच्या लिलावासाठी लाखोंची बोली लावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या श्री नागेश्वर महाराज भंडारा उत्सवातील लिलावामध्ये या वर्षीचा मानाच्या विड्याला तब्बल 91 लाख रुपयांची बोली लावली गेली.

मोशी - 91 लाख... एक वार-दोन वार... 91 लाख एक वार-दोन वार... आणि 91 लाख एक वार तीन वार... असा खर्जातील आवाज घुमत होता श्री नागेश्वर महाराज (Shri Nageshwar Maharaj) भंडारा उत्सवातील (Bhandara Utsav) महाराजांना अर्पण केलेल्या विविध वस्तूंच्या लिलाव (Auction) प्रसंगी मोशीतील श्री नागेश्वर महाराज देवस्थान सभागृहामध्ये लिलाव सुरु होता.

संपूर्ण महाराष्ट्रात मानाच्या विड्याच्या लिलावासाठी लाखोंची बोली लावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या श्री नागेश्वर महाराज भंडारा उत्सवातील लिलावामध्ये या वर्षीचा मानाच्या विड्याला तब्बल 91 लाख रुपयांची बोली लावली गेली आणि हा विडा घेतला मोशीतील उद्योजक गणेश तुकाराम कुदळे यांनी चक्क 91 लाख रुपयांना.

श्री नागेश्वर महाराज यांचा आशिर्वादच जणू आपणास मिळाला आणि या आशिर्वादानेच आपले कुटुंब व मोशी ग्रामस्थ सुखी आहेत. त्यामुळेच आपण हा विडा घेतला असल्याचे प्रतिक्रीया यावेळी गणेश कुदळे यांनी दिली. तर 39 लाख 2 हजार 22 रुपयांना मानाची ओटी उद्योजक निलेश बोराटे यांनी तर 22 लाख 2 हजार 22 रुपयांना रुपये बोली लावून मानाचा पहिला लिलाव पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अतिश बारणे यांनी तर दुसरा मानाचा लिलाव श्री नागेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नितीन सस्ते व उद्योजक विजय सस्ते यांनी 7 लाख रुपयांना घेतला.

मोशी गावच्या आजपर्यंतच्या इतिहासात मानाच्या विड्यासाठी ही एवढी प्रचंड मोठी बोली दुसऱ्यांदा उद्योजक गणेश कुदळे यांनी लावली असल्याने त्यांनी हा इतिहास घडविल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

दीडशे वर्षांची परंपरा जतन करत मोशीमध्ये श्री नागेश्वर महाराज भंडारा उत्सव सुरु आहे. गुरुवारी वारी (ता. 3) या उत्सवाचा दुसरा दिवस प्रसिद्ध असा लिलावाचा दिवस. मोशीतील भाविकांनी महाराजांना बोललेले नवस फेडण्यासाठी अथवा श्रद्धेपोटी महाराजांना सोन्या चांदीच्या वस्तूंपासून शेतातील फळे, भाजीपाला, गृहोपयोगी यासारख्या विविध वस्तू अर्पण करतात. याच विविध वस्तूंसह महाराजांचा मानाचा विडा, मानाची ओटी व मानाचे लिंबू आदी वस्तूंचा दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता या वस्तूंच्या लिलावाला सुरुवात झाली.

पिढ्यानपिढ्या लिलावाची बोली लावण्याचे काम नारायण केदारी, सागर केदारी आणि निखिल केदारी हे करत होते. आपल्या खर्जातील आवाजात एका एका वस्तूची ते बोली लावत होते. मोशी ग्रामस्थांचे आराध्य दैवत श्री नागेश्वर महाराज मंदिर सभागृहांमध्ये या लिलावाची बोली सुरू होती. कालपासून सुरू असलेल्या या उत्सवामध्ये मंदिर समितीचे विश्वस्त व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये हा लिलाव सुरु होता. यादरम्यान उत्सवातील वस्तूंचा लिलाव हा परिसरातील भाविकांच्या दृष्टीने या लिलावादरम्यान श्री नागेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त व ग्रामस्थ उपस्थित होते.

Ganesh Kudale
PCMC Election : डिजिटल प्रचारासाठी इच्छुकांची तयारी

एकुण लिलाव 2 कोटी 62 लाख 66 हजार रुपयांहून अधिक रुपयांच्या घरात गेला आहे. जमा झालेल्या या लिलावातील निधीचा देवस्थानच्या विविध जिर्णोद्धार कामे, ट्रस्टच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आदी कार्यांसाठी उपयोगात आणला जात असल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नितीन सस्ते सांगितले.

आमचे ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज यांच्या अशिर्वादानेच आम्हा सर्व मोशी ग्रामस्थांचे उत्तम सुरु आहे. हा विडा, ओटी व लिंबू घेण्याची प्रेरणाही महाराजांनीच दिली. महाराजांचा आशिर्वादच जणू आम्हाला मिळाला असून आपले कुटुंब व सर्व मोशी ग्रामस्थ सुखी आहे. त्यामुळेच आपण हा विडा, ओटी व मानाचे लिंबू यांचा लिलाव घेतला असल्याची प्रतिक्रीया यावेळी अनुक्रमे गणेश कुदळे, निलेश बोराटे व अतिश बारणे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.