पोल्ट्री व्यावसायिक
पोल्ट्री व्यावसायिकsakal

"पोल्ट्री व्यावसायिकांच्या अडचणी सोडवू"

तळेगावात झालेल्या बैठकीत आमदार सुनील शेळके यांचे आश्‍वासन
Published on

वडगाव मावळ : ‘‘मावळ तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांचे प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू,’’ असे आश्‍वासन आमदार सुनील शेळके यांनी दिले.

पोल्ट्री व्यावसायिक
पिंपरी-चिंचवड : नितीन लांडगे यांना अंतरिम जामीन मंजूर

मावळ तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांच्या अडचणींसंदर्भात आमदार शेळके यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. मावळ ॲग्रोचे संस्थापक माऊली दाभाडे, पोल्ट्री संघटक सोनबा गोपाळे गुरुजी, एकनाथ गाडे, सचिन आवटे, संभाजी केदारी, उत्तम शिंदे, बाळासाहेब खरमारे, संतोष घारे, महेश काकरे, शिवाजी शिंदे, सुभाष केदारी, महेश कुडले, प्रवीण शिंदे, गजानन खरमारे, विनायक बधाले आदी उपस्थित होते.

पोल्ट्री व्यावसायिक
पिंपरी : इच्छुकांकडून निवडणुकीची आशा पल्लवीत

तालुक्यात शेतीपूरक पोल्ट्री व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, येथील काही पोल्ट्री कंपन्या व्यावसायिकांची पिळवणूक करत असल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले. पोल्ट्री व्यावसायिकांना चांगल्या दर्जाची पिल्ले, खाद्य आणि औषधे द्यावीत. पक्षी वेळेत घेऊन जावेत. ग्रोव्हिंग चार्ज वाढवून मिळावा. पंधरा दिवसात शेतकऱ्यांचे पेमेंट कंपन्यांनी करावे आदी मागण्यांबाबत चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी व मागण्यांसाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्‍वासन आमदार शेळके यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()