‘आभाळ’भर दुःख पचवूनही त्याची ‘आबाळ’च
पिंपरी - कोरोनामुळे (Corona) आई गेली. वडिलांनाही हिरावून नेले. आता स्वतःवर म्हणजे सोमनाथ आभाळे (Somnath Aabhale) याच्यावर बुरशीजन्य म्युकरमायकोसिस (Mucormycosis) आजार ओढवला आहे. एक डोळा (Eye) निकामी झाला. आता दुसरा डोळा आणि जीव वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. आजअखेर १४ लाख खर्च झाले आहेत. अजूनही दररोज ७० हजारांची औषधे लागतात. त्याचाही तुटवडा आहे. सर्व पुंजी कधीच संपली आहे. मित्रांची धावाधाव सुरू आहे. कंपनीतील सहकारी आपल्या रजा विकून पैसे उभा करताहेत. औषधांसाठी भटकताहेत. (Somnath Aabhale Mucormycosis Sickness Help Treatment)
भोसरीतील सँडविक कॉलनीत राहणारे चाळीस वर्षीय सोमनाथ या दुष्टचक्रात अडकले कसे? भावाला कोरोना झाला म्हणून ते गावी नगरला गेले. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यातच आई-वडिलांची चाचणीही पॉझिटिव्ह आली. मग, आईला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये बेड शोधून तिच्यावर पण उपचार सुरू केले. आई व भाऊ ऑक्सिजनवर होते. वडील घरून उपचार घेत होते. दरम्यान, आई दोन दिवसांत गेली. मोठ्या भावाला याची कल्पना दिली नाही. स्वतःच दुःख पचवत आईचे अंत्यसंस्कार केले.
भाऊ बरा होऊन घरी आला. तोपर्यंत वडिलांनाही रुग्णालयात दाखल करावे लागले. या धावपळीत हायरिस्कमुळे सोमनाथनाही त्रास जाणवू लागला. चाचणी केली तर पॉझिटिव्ह आली. एकाच रूग्णालयात वडील व मुलगा. दोघांनाही ऑक्सिजन. त्यामुळे रेमडेसिव्हिर व ऑक्सिजनसाठी नातेवाइकांना खूप धावपळ करावी लागली. चार दिवसांनी वडिलांची झुंज संपली. यावेळी बऱ्या झालेल्या भावाने सोमनाथने कळू न देता वडिलांवर अंत्यसंस्कार केले. एक मे रोजी बरे होऊन सोमनाथ घरी आल्यावर कळले वडील गेले.
तेवढ्यात सोमनाथ यांचा त्यांचा एक डोळा सहा मे रोजी बारीक झाला. निदान झाले-बुरशीजन्य म्युकरमायकोसिस. एक डोळा निकामी झाला असून, दुसरा डोळा आणि त्याला वाचविण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. अगोदरच आर्थिक घडी विस्कळित झालेली असताना खर्च घरच्यांच्या आवाक्याबाहेर आहे. मित्र, सहकारी पैसे आणि औषधांसाठी धावाधाव करीत आहे.
मदतीसाठी संपर्क
सोमनाथ बबन आभाळे,
बचत खाते - ००३९०१५२६६३९,
आयएफसी-आयसीआयसी ०००००३९,
आयसीआयसीआय बँक, शाखा शिवाजीनगर, पुणे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.