Spine Road : रखडलेल्या स्पाइन रस्त्याला हवा वेग; चौदा वर्षांपासून मिळेना मुहूर्त

प्राधिकरणाने पुणे-मुंबई महामार्ग आणि पुणे-नाशिक महामार्ग यांना जोडणारा स्पाइन रस्ता तयार केला आहे.
pune district run way
pune district run waysakal
Updated on

पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने (पीसीएनटीडीए) निगडीतील भक्तीशक्ती चौक ते मोशी-भोसरी प्राधिकरण (नाशिक महामार्गावरील राजा शिवछत्रपती चौक) दरम्यान स्पाइन रस्ता विकसित केला आहे. मात्र, महापालिकेच्या हद्दीलगतच्या त्रिवेणीनगर येथील काम १४ वर्षांपासून रखडले आहे.

तेथील रस्ताबाधितांसाठी प्राधिकरणाने सात हजार चारशे चौरस मीटरचा भूखंड महापालिकेला दिला आहे. मात्र, अद्याप रस्त्याचे काम रखडलेलेच आहे. आगामी विधिमंडळ अधिवेशनात त्यावर तोडगा निघावा व रस्ता सलग व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्राधिकरणाने पुणे-मुंबई महामार्ग आणि पुणे-नाशिक महामार्ग यांना जोडणारा स्पाइन रस्ता तयार केला आहे. निगडी, प्राधिकरण, मोशी, चिखली यांना हा रस्ता जोडतो. स्पाइन रस्त्याचे त्रिवेणीनगर येथील सुमारे ३३० मीटर अंतरातील काम शिल्लक आहे. संबंधित ठिकाणच्या नागरिकांची घरे बाधित होत आहेत.

त्यामुळे ‘प्रथम पुनर्वसन करा, नंतर जागेचा ताबा देऊ,’ अशी नागरिकांनी भूमिका घेतली होती. स्पाइन रस्त्याचे काम २०११ मध्ये पूर्ण झाले. मात्र, त्रिवेणीनगर येथील बाधित नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटला नसल्याने काम अद्याप प्रलंबित आहे. दरम्यान, स्पाइन रस्ता बाधितांसाठी सोडत काढून प्राधिकरण सेक्टर ११ मधील भूखंड निश्चित केले आहेत. त्यांची आखणीही केली आहे. प्रत्यक्ष ताबा अद्याप मिळालेला नाही.

राज्य सरकारचे पत्र

राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने दोन वर्षांपूर्वी प्राधिकरणाला पाठविलेल्या पत्रात म्हटले होते की, पेठ क्रमांक दोनमधील यापूर्वी दिलेल्या १४,७८४ चौरस मीटर भूखंडाऐवजी पेठ क्रमांक ११ मधील सुमारे १४,७८४ प्रतिचौरस मीटर एवढ्या क्षेत्राचा शिघ्र गणकानुसार तसेच, सन्मुख रस्त्याच्या रुंदीनुसार ९,३५० रुपये प्रतिचौरस मीटर याप्रमाणे १३ कोटी ८२ लाख ३० हजार ४०० रुपये किमतीस प्राधिकरणाने पिंपरी-चिंचवड महापालिकेस जागेचा ताबा दिलेला आहे.

त्यास शासनाची कार्योत्तर मंजुरी देण्यात येत आहे. महापालिकेने पुनर्वसनासाठी मागणी केलेले पेठ क्रमांक ११ येथील सुमारे सहा हजार २८२.७२ चौरसमीटर एवढे वाढीव क्षेत्र प्रचलित शिघ्र गणकानुसार १२ हजार ९६० रुपये प्रतिचौरस मीटर व त्यामुध्ये सन्मुख रस्त्यामुळे १० टक्के प्रमाणे वाढ करून १४ हजार २५६ प्रतिचौरस मीटर दराने वाढीत येत आहे. प्राधिकरणातील भूखंडाची विल्हेवाट किंवा वितरण प्राधिकरणाच्या अटी व शर्तींच्या अनुषंगाने करण्यात येते. अशा सर्वसाधारण अटी प्रस्तुत प्रकरणी बंधनकारक राहतील.

1) सद्यःस्थिती?

  • नाशिक महामार्गावरील राजा शिवछत्रपती चौकापासून स्पाइन रस्ता कार्यान्वित

  • भक्तीशक्ती चौकापासून त्रिवेणीनगर तळवडे रस्ता कॉर्नरपर्यंत रस्ता कार्यान्वित

  • दोन्ही बाजूकडील स्पाइन रस्ता जोडण्यासाठी ३३० मीटर लांबीच्या काम रखडलेले

  • रस्त्यामुळे बाधित घरे पाडली असून, कच्च्या रस्त्यावरून वाहतूक सुरू

  • तळवडे कॉर्नर येथून एसआरए इमारतीजवळील छोट्या रस्त्याने वळण मार्ग

2) रस्ता तयार झाल्यास

  • स्पाइन रस्त्यावरील वाहतूक विना अडथळा सुरू होईल, वळण रस्त्याच्या त्रासातून सुटका

  • दुर्गानगर, तळवडे, निगडी व भोसरीकडून येणाऱ्या वाहनांमुळे त्रिवेणीनगर चौकात होणारी कोंडी सुटेल

  • आळंदी-पुणे पालखी मार्ग, नाशिक महामार्ग, मुंबई-पुणे महामार्ग व द्रुतगती मार्ग जोडणार

  • भोसरी-निगडी आणि देहू-आळंदी रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होईल

  • द्रुतगती मार्ग आणि भोसरी भागात पिंपरी, चिंचवड भागातून ये-जा करणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग मिळेल

वस्तुस्थिती

त्रिवेणीनगर येथील स्पाइन रस्ता बाधितांच्या पुनर्वसनासाठी प्राधिकरणाने सेक्‍टर क्रमांक ११ मधील १४ हजार ७८४ चौरस मीटर क्षेत्राच्या भुखंडाचा ताबा महापालिकेकडे दिला आहे. त्या निर्णयाला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्याबाबतचे पत्र राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने प्राधिकरणाला पाठविले आहे.

स्पाइन रस्त्यामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी आमदार महेश लांडगे यांनीही सरकारकडे पाठपुरावा केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मान्यता मिळाली आहे. मात्र, रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्णी बाधित सर्व नागरिकांना पर्यायी जागा द्यावी लागणार आहे.

त्रिवेणीनगर येथील स्पाइन रस्त्याने बाधित नागरिकांना प्राधिकरण सेक्टर ११ मध्ये बाधितांना पर्यायी जागा दिली आहे. काही जागेची भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. काही बाधित नागरिकांकडून घरांचे मालकी हक्क व त्या संबंधितांची काही कागदपत्रे हवी आहेत. ती प्राप्त झाल्यानंतर प्रक्रिया सुलभ होईल.

- मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.