पिंपरी - येत्या काही दिवसांतच विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. परीक्षेचे वेळापत्रक, ठिकाण, विषयांचा तणाव विद्यार्थी आणि पालकांना असतो. यासाठीच सकाळ विद्या व मोशन ॲकॅडमीच्या वतीने ‘दहावीच्या परीक्षेला सामोरे जाताना’ या विषयावर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचे आयोजन केले आहे. १० नोव्हेंबरला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. अ. ल. देशमुख हे मार्गदर्शन करणार आहेत.