Success Mantra : दूरदृष्टी, परिश्रम, दृढ निश्चय हिच यशाची त्रिसूत्री
Success Mantra : ‘‘आजच्या स्पर्धात्मक युगात यश प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांवर ताण-तणाव असतात. अशा परिस्थितीचा विचार करता जीवनात यशस्वी होण्यासाठी भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी, अथक परिश्रम, ध्येय प्राप्तीसाठी दृढनिश्चय या त्रिसूत्रीचा अवलंब विद्यार्थ्यांनी करावा. तरच पुढील आयुष्यात यशोशिखरावर पोहचाल’’, असा कानमंत्र आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू रितू फोगाट हिने दिला.
पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड रिसर्चच्या (पीसीसीओईआर) वतीने ‘टेडेक्स - पीसीसीओईआर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी, ती बोलत होती. यावेळी मध्यप्रदेश पोलिस दलातील अधिकारी डॉ.वरूण कपूर, अभिनेता शंतनू रांगणेकर, आरजे सोहम शहाणे, कॅलिस्थेनिक्स सेलिब्रिटी ट्रेनर कर्स्टन वरेला, उद्योजक अजिंक्य काळभोर, प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, डॉ. शितलकुमार रवंदळे आदी उपस्थित होते.
शिव व्याख्याते नामदेवराव जाधव यांनी ‘द ह्युमन अल्गोरिदम’ मानवी मानसिकतेचा एक मनमोहक शोध, विचार, भावना आणि निर्णय क्षमता यावर मार्गदर्शन केले. डॉ.वरूण कपूर यांनी डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात सायबर क्राईमचा वाढता धोका, त्याव्दारे होणारे गुन्हे आणि सर्वसामान्यांनी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. सोहम शहाणे, कर्स्टन वरेला, शंतनु रांगणेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
‘पीसीईटी’चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.हरीश तिवारी यांनी प्रास्ताविक केले. डॉ.राहुल मापारी यांनी स्वागत केले. तर प्रा. त्रिवेणी ढमाले यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.