: महिलांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या ‘योगिनी’ ; योग अभ्यासाच्या वर्गातून मिळविला रोजगार!
Success Storysakal

Success Story: महिलांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या ‘योगिनी’ ; योग अभ्यासाच्या वर्गातून मिळविला रोजगार!

Pimpri: महापालिकेकडून त्यांना मानधन देण्यात येत असल्याने त्यातून या महिलांचे अर्थाजनही होत आहे.
Published on

अश्विनी पवार ः सकाळ वृत्तसेवा

Pimpri : कुटुंबातील प्रत्येकाचा आरोग्यासाठी झटणारी स्त्री ही स्वतःच्या आरोग्याकडे मात्र नेहमीच दुर्लक्ष करते. वेळ नसल्याचे कारण सांगून किंवा जीम व योगवर्गाची फी पाहून अनेकदा व्यायाम करायचे महिलांकडून टाळले जाते. जिथे शिकलेल्या महिलाच आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. तिथे सर्वसामान्य व गरीब आर्थिक परिस्थितीतून आलेल्या महिलांमध्ये तर याविषयी जागरुकताच नसते.

या महिलांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी व योगाचे महत्त्व कळावे यासाठी मोरवाडीतील योगिनी महिला बचत गटाच्या वतीने महिलांसाठी योगवर्ग सुरू करण्यात आले आहेत. महापालिकेकडून त्यांना मानधन देण्यात येत असल्याने त्यातून या महिलांचे अर्थाजनही होत आहे.

योगिनी महिला बचत गटाच्या अध्यक्ष योगिता तरडे या योग शिक्षिका म्हणून गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत होत्या. प्रत्यक्ष शिकविण्यासोबतच त्यांचे ऑनलाइन क्लासही सुरू होते. त्यांच्याकडून योगाचे प्रशिक्षण घेतलेल्या अनेक महिलांनी स्वतःचे योगवर्ग सुरू केले आहेत. मात्र, पार वर्षांच्या कालावधीत फारच कमी महिला आपल्या आरोग्यासाठी योगाकडे वळतात, असे या महिलांच्या लक्षात आले.

त्यातूनच महिलांसाठी मोफत योगवर्ग घेण्याची संकल्पना पुढे आली. यासाठी योगिता यांनी योग शिक्षिका व आपल्याकडे योग अभ्यास शिकणाऱ्या महिलांसोबत बचत गटाची स्थापना केली. त्यांच्या या संकल्पनेला महापालिकेचेही त्यांना सहकार्य लाभले. योगवर्ग घेण्यासाठी आवश्यक जागा पुरविण्यासोबतच योगशिक्षकांना मानधन देण्याचीही तयारी महापालिका प्रशासनाने दर्शविली. यामुळे आपले खासगी योगवर्ग सांभाळून या महिला मोफत योगवर्ग घेत आहेत. त्यातून समाजासाठी काहीतरी केल्याचे समाधानही त्यांना मिळत आहे.

आम्ही सर्व महिलांनी एकत्रच योग शिक्षकांचे प्रशिक्षण घेतले होते. मी खासगी ऑनलाइन योग वर्ग घेते. या व्यतिरिक्त बचत गटाच्या माध्यमातून आम्ही महापालिकेच्या बॅचमधल्या ९० ते १०० महिलांना आम्ही योगाचे धडे देत आहोत. यातून महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरुकता निर्माण होत आहे.’’

- माधुरी तळेले, सदस्या, योगिनी महिला बचत गट

महापालिकेचे वर्ग दीड महिन्यांपासून सुरू झाले आहे. महिलांचा अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. अगदी १८ वर्षांच्या तरुणींपासून ज्येष्ठ नागरिक महिलाही आमच्या योग वर्गाला येतात. योगिता तरडे यांच्या मार्गदर्शनामुळेच हे शक्य झाले आहे.’’

- वासंती भोसले, सदस्या, योगिनी महिला बचत गट

मी गेल्या अनेक वर्षांपासून योग शिकविण्याचे काम करते. आपली बदलती जीवनशैली व कोरोनानंतर उद्भवणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी पाहता योगाचे महत्त्व हे वाढले आहे. हेच महत्त्व इतर महिलांना कळावे यासाठी आम्ही मोफत योगवर्ग सुरू करण्याचे ठरविले. बचत गटाच्या माध्यमातून महापालिककडे प्रस्ताव ठेवला. महापालिकेने आम्हाला विरंगुळा केंद्राची जागा उपलब्ध करुन दिली आहे. योग शिक्षकाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अनेक महिलांचे यातून अर्थार्जनही होत आहे.

- योगिता तरडे, अध्यक्ष , योगिनी महिला बचत गट

मी योगिता यांच्याकडेच योग अभ्यासाचे धडे घेतले. त्यानंतर मी स्वतःचे खासगी क्लास घेत होते. मात्र, महिला अनेकदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात त्यातूनच मोफत योग वर्गाची संकल्पना पुढे आली. त्यातूनच मी त्यांच्या बचत गटात सहभागी झाले.

- सिंधु काजळे , सदस्या, योगिनी महिला बचत गट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.