पिंपरी : ‘‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांनी शाडू माती अथवा कागदी लगद्यासारख्या विघटनशील घटकांपासून बनविलेल्या गणेशमूर्तींची स्थापना करावी. सार्वजनिक मंडळांनी चार फुटांपर्यंत, तर घरातील गणेशमूर्तीची दोन फुटांपर्यंत उंची असावी. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या मूर्तींच्या विसर्जनास प्रतिबंध आहे. घरगुती आरास व देखाव्यांसाठी प्लास्टिक, थर्माकोल व पर्यावरणास हानिकारक वस्तूंचा वापर करू नये,’’ असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केले. (PCMC News)
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त व महापौर उषा ढोरे यांनी गणेश भक्तांना आवाहन केले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाण्याचा स्रोत दूषित करणे हा दंडनीय अपराध आहे. त्यामुळे नदीचे पाणी दूषित न होण्यासाठी नागरिक व गणेश मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले. महापौर उषा ढोरे म्हणाल्या, ‘‘यंदाचा गणेशोत्सव कोरोनाविषयक नियमांचे पालन करून पर्यावरणपूरक उत्साही व आनंदी वातावरणात साजरा करावा.’’
आयुक्तांच्या सूचना
गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्याघरी करावे
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गर्दी करू नये
मूर्ती विसर्जनासाठी विसर्जन हौद नसतील
मूर्तीसह निर्माल्य दान स्वीकारण्यासाठी फिरते रथ
आरती, भजन, कीर्तन, धार्मिक कार्यक्रमास मनाई
मंडळांनी आरती व दर्शनाची सुविधा ऑनलाइन करावी
आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यास मनाई
गणेश मंडपामध्ये निर्जंतुकीकरण करून घ्यावे
थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करावी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.