- बेलाजी पात्रे
वाकड - एकमेंका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ असे म्हणतं एकमेकांच्या सुख-दुःखात व संकटात धावून जाण्याची आपली संस्कृती आहे. त्याचा प्रत्यय नुकताच आला. कुठले नाते, ना कसली ओळख असे असतानाही दैनिक सकाळची बातमी वाचून थेरगावातील बारणे कुटुंबियांकडून माणुसकीच्या नात्याने मृत्यूशी झुंज देणाऱ्या राष्ट्रीय पैलवान विजय डोईफोडेला उपचारांसाठी तब्बल एक लाखांची आर्थिक मदत करण्यात आली.