तृतीयपंथी सुरक्षारक्षक : अवहेलनेपेक्षा स्वाभिमानाने जीवन जगू

महापालिका आयुक्तांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप
Third party security guards Nikita at Pimpri Municipal Corporation
Third party security guards Nikita at Pimpri Municipal Corporationsakal
Updated on

पिंपरी : अपमान व अवहेलनेचे जीवन जगण्यापेक्षा स्वाभिमानी जीवन जगावे असे आम्हाला सतत वाटत होते. आम्हाला समाजाने नाकारले, पण महापालिकेने आधार दिला. आमच्यावर विश्वास ठेवला. या मदतीच्या हातामुळे आम्हाला जगण्याची उभारी आली. महापालिकेने आम्हाला दिलेला हा सन्मान असून आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, हे भावनिक उद्गार आहेत खासगी संस्थेमार्फत महापालिका सेवेत रुजू झालेल्या तृतीयपंथी नवनियुक्त सुरक्षारक्षक निकिता मुख्यदल यांचे.

तृतीयपंथी घटकांना मुख्य

प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेने तृतीयपंथी पुनर्वसन कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत तृतीयपंथीयांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. त्यानुसार तृतीयपंथीयांची कंत्राटी तत्त्वावर सुरक्षारक्षक आणि ग्रीन मार्शल म्हणून खासगी संस्थेमार्फत महापालिका सेवेत नेमणूक केली आहे. त्यांना शुक्रवारी (ता. १) आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. तृतीयपंथी घटकांना मुख्य प्रवाहात सामावून घेताना आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यांनी धाडसाने टाकलेले पाऊल पथदर्शक चळवळ उभी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. सुरक्षारक्षक आणि ग्रीन मार्शल म्हणून सोपविलेली जबाबदारी तृतीयपंथीयांनी यशस्वीपणे निभावल्यास ही चळवळ इतरांसाठी अनुकरणीय ठरेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

आयुक्त पाटील म्हणाले, ‘‘मुख्य प्रवाहात येण्यासाठी महापालिकेने देऊ केलेल्या नोकरीचा स्वीकार करून तृतीयपंथीयांनी धाडसी पाऊल उचलले आहे. उपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खूप आव्हाने उभी असतात. तृतीयपंथीयांनी स्वावलंबी जीवन जगण्यासाठी हे आव्हान स्वीकारले हेच खूप महत्त्वाचे आहे. तृतीयपंथीयांच्या जीवनात आलेला सकारात्मक बदल आणि केलेली यशस्वी वाटचाल इतरांसाठी अनुकरणीय असेल. ही एक पथदर्शक चळवळ आहे. भविष्यात शासकीय स्थायी आस्थापनेमध्येही त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक अडथळे येतील, ते पार करण्याची हिंमत ठेवा. भविष्यात या उपक्रमामुळे खूप सकारात्मक गोष्टी घडण्यास चालना मिळणार आहे. लोकांनी तुमच्याबद्दल लिहिले, बोलले पाहिजे असे चांगले काम करून महापालिकेचा विश्वास सार्थ ठरवावा. आपल्या कामातून समाजामध्ये वेगळी ओळख निर्माण होणार असून आपण समाजासमोर नवीन आदर्श निर्माण करा.’’

ग्रीन मार्शल व सुरक्षारक्षक तृतीयपंथी

अनुष्का जाधव, नयना कोटगीर, झोया शिरोळे, तुषार वाडिले, आतिष तुपे, वैशाली मराठे, मीहिका वर्मा, प्रशांत अडकने, रूपा टाकसाळ, साझ प्रसादसिंग, निकिता मुख्यदल, पूजा पवार, संजू काठे, प्रमित पवार, शायना रॉय, सचिन देशपांडे.

ट्रान्समेनचे प्रमाणपत्र सहजतेने मिळत नाही. अनेक आस्थापना नोकरी देत नाहीत. भीकही मागता येत नाही. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत आमच्या व्यथा समजून घेऊन महापालिकेच्या ग्रीन मार्शल पथकात काम करण्याची संधी दिली. हा सन्मानाचा हात आम्ही कधीही विसरू शकत नाही.

- प्रेम लोटलीकर, तृतीयपंथी, ग्रीन मार्शल पथक

आम्ही घर सोडल्यानंतर आमच्या वाट्याला चांगले जगणे येणार नाही असे वाटले होते. आयुष्यभर अपमान सहन करावा लागणार, याच भावनेतून आम्ही आयुष्य जगत होतो. सन्मानाचे जीवन हे आमच्यासाठी स्वप्न होते. हे स्वप्न महापालिकेने प्रत्यक्षात साकार केले असून या सन्मानाबद्दल आम्ही ऋणी आहोत.

- रूपा टाकसाळ, तृतीयपंथी, सुरक्षारक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()