पिंपरी - आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी एकमेकांवर झाडत प्रचाराची धूळ सोमवारीच (ता. १८) खाली बसली आहे. मतदारांनी कर्तव्य म्हणून बुधवारी (ता. २०) मतदान करून भावी आमदारांचे मताधिक्य मतदान यंत्रात बंद केले आहे. आता विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याचीच उत्सुकता लागली आहे.