‘गरीबांच्या फ्रीज’ला
ग्राहकांची मागणी

‘गरीबांच्या फ्रीज’ला ग्राहकांची मागणी

Published on

पिंपळे गुरव, ता. ६ ः उष्णतेचा पारा उंचावल्यामुळे माठांना मागणी वाढली आहे.
पिंपळे गुरव, नवी सांगवी परिसरात ठिकठिकाणी माठ विक्रीची दुकाने थाटलेली दिसत आहेत. सर्वच स्तरातील नागरिक मातीचे माठ खरेदी करताना दिसून येत आहेत.
लाल, काळ्या रंगाचे माठ आणि नळ लावलेले माठ बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने माठांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून, माठाला चांगली मागणी वाढली आहे.

कोट
उन्हाळ्यात मातीच्या माठांना जास्त मागणी असते. यावर्षी राजस्थान येथील जयपूर माठाला जास्त मागणी आहे. मोठ्या प्रमाणात वीजदर वाढल्याने नागरिक माठ खरेदीसाठी गर्दी करत आहे.

नारायण प्रजापती, माठविक्रेते

कोट
आरो वॉटर मशीन, मिनरल वॉटर, पाण्याचे जार, थंड पाण्याच्या बाटल्या, फ्रीज या सर्व उपकरणांचा वापरासाठी वीज लागते. आधीच विजेचे बिल हे अव्वाच्या सव्वा येत आहे. म्हणूनच आम्हाला ‘गरिबांचा फ्रीज’ परवडत आहे.

मनीषा आवळेकर, एक गृहिणी
00247

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()