ज्येष्ठ ऊसतोडणी कामगारांचा सत्कार

ज्येष्ठ ऊसतोडणी कामगारांचा सत्कार

Published on

तमनाकवाडा येथील सेवा संस्थेत
मुश्रीफ-मंडलिक आघाडी विजयी
सेनापती कापशी ः तमनाकवाडा (ता. कागल) येथील श्री लक्ष्मी विकास सेवा संस्थेत मुश्रीफ-मंडलिक-संजय घाटगे महाआघाडीचा दणदणीत विजय झाला. विरोधात राजे आघाडी लढली. संस्थेत मुश्रीफ गटाची सत्ता असून यावेळी मुश्रीफ, मंडलिक, संजय घाटगे व प्रवीणसिंह पाटील गटाने आघाडी केली होती. त्यांना समरजितसिंह घाटगे गटाने केलेल्या विरोधात आघाडीने मोठ्या फरकाने विजय मिळविला. विजयी झालेले उमेदवार ः उत्तम कसलकर, आनंदा कोकितकर, संजयकुमार चौगले, बळवंत तिप्पे, दत्तात्रय चौगले, संभाजी चौगले, शिवाजी तिप्पे, सौरभ तिप्पे, विनोद कांबळे, दादाबी देसाई, गितांजली लांडगे व रावसो पाटील.

१५५०
ऊसतोड कामगारांचा मेळावा
राशिवडे बुद्रुक ः ऊसतोडणी कामगारांची एकीची वज्रमूठ झाली तरच मागण्यासांठी पाठपुरावा करता येईल, असे आवाहन डॉ. प्रा. सुभाष जाधव यानी व्यक्त केले. पुंगाव (ता. राधानगरी) येथे कामगारांच्या विजयी मेळाव्यात ते बोलत होते. युवराज पाटील अध्यक्षस्थानी होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कल्याणकारी मंडळाच्या कामाचे उद्‌घाटन केले. यासाठी कामगारांच्या वतीने येथे विजयी मेळावा घेतला. प्रा. सुभाष जाधव यांनी संघटेच्या कामाची माहिती दिली. ज्येष्ठ ऊसतोड कामगारांचा सत्कार केला. मेळाव्याला तंटामुक्त अध्यक्ष अशोक पवार, तलाठी विकास येरूडकर, दिनकर आदमापूरे, रमेश पाटील, आनंदा पाटील, पांडुरंग कोईगडे, रंगराव पाटील, बाळासाहेब पवार, सदाशिव मांगुलकर, रामचंद्र बुटके, गुंडा कांबळे, रंगराव कोदले उपस्थित होते. धनाजी बरगे यानी सूत्रसंचालन केले. राजू कुलकर्णी यांनी आभार मानले.

१३१८, १३१९
‘मोताईदेवी’च्या अध्यक्षपदी दगडू लटके
बाजार भोगाव : मोताईवाडी (ता. पन्हाळा) मोताईदेवी विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी दगडू लक्ष्मण लटके आणि उपाध्यक्षपदी महादेव पांडुरंग माटे यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी के. एस. ठाकरे होते. गत महिन्यात संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. अध्यक्षपदासाठी दगडू लटके तर उपाध्यक्षपदासाठी महादेव माटे यांचेच अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड झाली. पांडुरंग पाटील, युवराज पाटील, रवींद्र पाटील, धर्मा खोत, शिवाजी वाळवेकर, सुनील पाटील, मालूबाई पाटील, मलप्रभा गुरव, सचिन पाटील, देवदास पोवार, रामदास हुरकुरली या नूतन संचालकासह सचिव विश्वास तेली उपस्थित होते. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला.

एन. डी. पाटील अध्यक्षपदी
जयसिंगपूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी एन. डी. पाटील यांची फेरनिवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी रावसो तारांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून पी. जे. मेश्राम यांनी काम पाहिले. यावेळी संचालक रामगोंडा पाटील, आप्पालाल शेख, सागर कऱ्याप्पा, पल्लेश माने, संजय लडगे, आण्‍णासो भगाटे, आबा शिंगे, दिलीप परीट, अंजना गुरव, नंदा पाटील, सचिव बाबासो पाटील उपस्थित होते.


01610
पोवार दूध संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र
शिरोली दुमाला : सडोली दुमाला (ता. करवीर) येथील सदाशिव बाळू पोवार सहकारी दूध व्यावसायिक संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र मिळाले. गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते स्वीकारले. ‘गोकुळ’चे सुपरवायझर प्रदीप पाटील, के. वाय. पाटील, संजय पाटील, सर्जेराव पोवार, नितीन पोवार, नामदेव केसरकर, संदीप पोवार, राहुल कुईगडे, राजवीर कुईगडे उपस्थित होते.

२८५०
कोलोली केंद्रशाळेचे प्रज्ञाशोधमध्ये यश
पुनाळ :कोलोली (ता. पन्हाळा) केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळवले. सातवीमधील यशस्वी विद्यार्थी असे : अथर्व युवराज सावंत (१३२ गुण), प्रणव प्रताप पाटील (१२८), वेदिका धनाजी बिळासकर (१२६), शुभम् बाबाजी चव्हाण (११२), पृथ्वीराज राजाराम तांबवेकर (१०८). चौथीचे यशस्वी विद्यार्थी असे ः वरदराज पंडित माने (१५२), विराज तानाजी जाधव (१४८). विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक लक्ष्मण पोवार, वर्गशिक्षक अनिल आंगठेकर, संजय गावडे, वर्गशिक्षक संतोष जायभाय, अजय दाभोळकर, अरुणा वसावे, सुवर्णा कणसेयांचे मार्गदर्शन लाभले.


1504
शाळांमध्ये जंतनाशक गोळ्या वाटप
बोरपाडळे : जागतिक जंतनाशक दिनाच्या औचित्याने आरोग्य विभागाने परिसरातील शाळांमध्ये जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले. १ ते १९ वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांना लाभ मिळाला. बोरपाडळे शाळेत आरोग्यसेवक मयुरेश तेली, आशासेविका अलिशा समूद्रे यांनी गोळ्यांचे वितरण केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनिया कदम यांनी गावभेटी देत आढावा घेतला. तसेच डॉ. अहिल्या कणसे, उपकेंद्र सी.एच.ओ. डॉक्टर्स, पर्यवेक्षक संपत पाटील, गोपाळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यसेवक, आशासेविका, शिक्षकांचे सहकार्य लाभले.


११८५
वडणेगत रस्ता डांबरीकरणाचा प्रारंभ
वडणगे ः येथील शंकर अण्णानगरमधील रस्ता डांबरीकरण कामाचा प्रारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या हस्ते झाला. महिला जिल्हा प्रमुख शुभांगी पोवार यांच्या प्रयत्नातून विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी दहा लाखांचा निधी दिली. प्रांरंगीप्रसंगी बाजीराव पाटील, उपसरपंच रमेश कुंभार, कृष्णात जौंदाळ, शुभांगी पोवार, सुनील पोवार, ग्रामपंचायत सदस्य सूरज पाटील, सतीश पाटील, सयाजी घोरपडे, पूजा मिसाळ, अनिल परीट, महेश मिसाळ, संतोष पाटील, महालिंग लांडगे, दत्ता पाटील, तानाजी माने आदी उपस्थित होते.

येळवडेत आज शेतीवर व्याख्यान
राशिवडे बुद्रुक : येळवडे (ता. राधानगरी) येथे उद्या (ता. २६) कृषीभूषण संजीव माने यांचे ‘ऊस पिकाची यशस्वी लागवड’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. डॉ. डी. वाय. पाटील कृषी विज्ञान केंद्र तळसंदे व येथील शेतकरी मंडळाच्या वतीने याचे आयोजन केले आहे. सकाळी अकरा वाजता येथील दत्त मंदिर मंदिरासमोरील सांस्कृतिक हॉलमध्ये व्याख्यानाला शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. जयवंत जगताप व डॉ. सुधीर सूर्यगंध यांनी केले आहे.

बामणी येथे आज रिंगण सोहळा
सिद्धनेर्ली ः बामणी (ता. कागल) येथे उद्या (ता. २६) रिंगण सोहळा होणार आहे. आळंदी येथे होणाऱ्या सोहळ्यातील माऊलींचे मानाचे अश्व आणण्यात येणार आहेत. येथे हरिनाम सप्ताहाचे १२६ वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने येथील पांडुरंग भजनी मंडळाने ग्रामस्थांच्या सहकार्याने सोहळ्याचे आयोजन केले आहे. सकाळी आठ वाजता श्री क्षेत्र विठ्ठल रखुमाई मंदिरपासून दिंडी सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. बामणी फाटा येथे रिंगण सोहळा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.