सागरी महामार्ग तीन वर्षांत पूर्ण होणार; राज्य सरकारकडून १० हजार कोटींची तरतूद
मुरूड : माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले (Barrister Abdul Rahman Antulay) यांनी रेवस-रेड्डी या सागरी महामार्गाचे (Revas reddy coastal road) स्वप्न पाहिले होते. ते येत्या तीन वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद (Ten thousand core fund) राज्य सरकारने (Maharashtra Government) केली असून या मार्गावर ९४ पर्यटन स्थळे विकसित करण्यात येणार आहेत. देश-विदेशातील पर्यटकांनाही आकर्षित करतील, असा दावा खासदार सुनील तटकरे (Sunil tatkare) यांनी मुरूड येथील एका कार्यक्रमात केला.
पालिका निवडणुकांचा निर्णय हा ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयीन निकालानंतर बहुधा घेण्यात येईल. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या आघाडीबाबत स्थानिक पातळीवर पक्षीय परिस्थिती पाहूनच नेते मंडळी घेतील. राज्य पातळीवर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही महायुती असल्याने एकत्रित निवडणूक लढणे अभिप्रेत असल्याचे मत तटकरे यांनी सांगितले.
मुरूड येथील पंचायत समिती सभागृहास डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्यात आले आहे. कार्यक्रमाला मुरूड पंचायत समिती सभापती आशिका ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर, शिवसेना मुरूड तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, अनंता ठाकूर, उपसभापती चंद्रकांत मोहिते, अतिकभाई खतीब, बाबा दांडेकर, माजी सभापती स्मिता खेडेकर, राजश्री मिसाळ, प्रणिता पाटील उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.