उत्तूरला उद्या आरोग्य शिबीर
‘नवनगर विकास प्राधिकरणाचे विलीनीकरण होऊन सहा महिने उलटूनही भूखंड हस्तांतराच्या फायली अद्याप महापालिका प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या नाहीत.
पिंपरी - ‘नवनगर विकास प्राधिकरणाचे (Pradhikaran) विलीनीकरण (Merger) होऊन सहा महिने उलटूनही भूखंड हस्तांतराच्या फायली (Plot Transfer Files) अद्याप महापालिका प्रशासनाने (Municipal Administrative) ताब्यात घेतलेल्या नाहीत. त्यामुळे हस्तांतर प्रक्रियेविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या प्राधिकरण भूखंड हस्तांतरण फायलींचा तातडीने निपटारा करावा,’ अशी मागणी भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे (Mahesh Landage) यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
आमदार लांडगे यांनी निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारच्या सात जूनच्या अधिसूचनेद्वारे प्राधिकरणाचे पीएमआरडीएमध्ये विलीनीकरण करण्यात आले. पेठ क्रमांक पाच व आठ येथील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, पेठ क्रमांक नऊ, ११, १२ आणि भोसरी मध्यवर्ती सुविधा केंद्र यांचे एकूण क्षेत्र ३७५.९० हेक्टर आहे. त्यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून पीएमआरडीएची नियुक्ती केली आहे. उर्वरित क्षेत्राची जबाबदारी महापालिकेकडे आहे. पेठ एक ते २० मधील फायलींचा ताबा घ्यावा, यासाठी प्राधिकरणाने नोव्हेंबर महिन्यात महापालिकेला कळविले आहे.
मात्र, अद्याप ही कागदपत्रे हस्तांतर करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. प्राधिकरणाच्या रेकॉर्ड रूममध्येच ही कागदपत्रे पडून आहेत. प्राधिकरणाकडील भूखंडांचे महापालिकेला हस्तांतर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांच्या सात हजार फायलींचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे. पेठ एक ते २८ मधील कागदपत्रांसाठी ही प्रक्रिया केली आहे. पेठ २९ मधील कागदपत्रांचे स्कॅनिंग सध्या सुरू आहे. पेठ २९ पासून ४२ पर्यंतच्या पेठांचे काम बाकी आहे. चिखली व आकुर्डी मध्यवर्ती सुविधा केंद्रातील सुमारे एक हजार फायलींची स्कॅनिंग प्रक्रिया प्रलंबित आहे. त्यामुळे भूखंड हस्तांतर रखडले आहे. याबाबत प्रशासनाकडून तत्काळ कार्यवाही व्हावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.