मुंबई : सहव्याधी, उशिरा रुग्ण दाखल झाल्याने कोरोना मृत्यूंत वाढ
मुंबई : कोविड काळात (corona pandemic) सेव्हन हिल्स रुग्णालय (seven hills hospital) कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचे महत्त्वाचे केंद्र झाले होते. येथे कोरोना मृत्यूची संख्या (corona deaths) अधिक होती. त्यामुळे येथील कोरोना मृत्यू झालेल्या प्रकरणांवर अभ्यास करण्यात आला. आधी छोट्या उपचार केंद्रांमध्ये उपचार करून उशिरा रुग्ण दाखल झाल्याने मृत्यूचे प्रमाण (corona death ratio) अधिक असल्याचे अहवालात स्पष्ट म्हटले आहे. यात सहव्याधी रुग्णांची संख्या अधिक होती, असेही समोर आले आहे.
या अहवालानुसार ८४ टक्के मृतांमध्ये दोनपेक्षा अधिक सहव्याधी असल्याचे नमूद करण्यात आले. हा अहवाल एप्रिल २०२० आणि मार्च २०२१ दरम्यान नोंदवलेल्या मृत्यू संख्येवर करण्यात आला आहे. यात महिला आणि तरुणांपेक्षा वृद्ध पुरुषांचे ६८ टक्के मृत्यूचे प्रमाण होते. त्यात सेव्हन हिल्स रुग्णालयात उशिरा आल्याने ऑक्सिजनची उच्च आवश्यकता असलेल्या रुग्णांमध्ये गंभीर स्थिती निर्माण झाली असल्याचे निरीक्षण मांडण्यात आले.
मार्च २०२० मध्ये सेव्हन हिल्स रुग्णालय क्वारंटाईन सेंटर म्हणून सुरू करण्यात आले; मात्र रुग्ण सतत वाढत असल्याने लगेचच ते पूर्ण कोविड उपचारासाठी सुरू केले. या वेळी १८०० खाटा तयार ठेवण्यात आल्या. तसेच गंभीर रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात झाली. सेव्हन हिल्स रुग्णालयात मार्च २०२० ते एप्रिल २०२१ या कालावधीत १ हजार ३०४ कोविड मृत्यूंचा निरीक्षण अहवाल तयार करण्यात आला. या कालावधीत रुग्णालयात २१ हजार ३४८ रुग्णांवर उपचार करण्यात आले; तर तीन लाटांमध्ये ४७ हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
गरीब मधुमेही तसेच उच्च रक्तदाबाने आणि हृदयविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांवर उपचार केले असल्याचे उपअधिष्ठाता डॉ. स्मिता चव्हाण यांनी सांगितले. यातील २१ टक्के रुग्णांना सहव्याधी होत्या; तर एखाद-दुसऱ्याला एकाहून अधिक सहव्याधी असल्याचे सांगण्यात आले; मात्र चार-पाच दिवस एखाद्या लहान रुग्णालयात उपचार केल्यानंतर इकडे दाखल करण्यात आले असल्याचे गंभीर रुग्णांमध्ये आढळून आले.
अत्याधुनिक ऑक्सिजनची आवश्यकता
९३.५ टक्के रुग्णांना अत्याधुनिक ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने येथे आणण्यात आले होते; तर ६५ टक्के रुग्णांना दाखल करतानाच व्हेंटिलेटरची गरज लागत असल्याचे सेव्हन हिल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.