देहूरोड राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या वतीने खड्ढे बुजविले
Sakal

देहूरोड राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या वतीने खड्ढे बुजविले

गेल्या पाच दिवसांत कोरोना संसर्गाचे शहरातील प्रमाण पाच पट वाढले आहे. पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे.
Published on
Summary

गेल्या पाच दिवसांत कोरोना संसर्गाचे शहरातील प्रमाण पाच पट वाढले आहे. पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे.

पिंपरी - गेल्या पाच दिवसांत कोरोना संसर्गाचे (Corona Infection) शहरातील प्रमाण पाच पट वाढले (Increase) आहे. पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे. असे असले तरी गंभीर रुग्णांची (Patients) संख्या नगण्य असून, घरीच उपचार घेणाऱ्यांचे अर्थात गृहविलगीकरणातील रुग्णांचे प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. (corona patients Five times increase in Pimpri chinchwad city five days)

शहरातील कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या आठ दिवसांपासून वाढू लागली आहे. त्यापूर्वी प्रतिदिन पन्नासपेक्षाही कमी रुग्ण आढळत होते. ती संख्या आता पाचशेपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. कोरोना बरोबरच ओमिक्रॉन संसर्गाचीही तपासणी केली जात आहे.

दृष्टिक्षेपात कोरोना संसर्ग

तारीख / तपासणी / पॉझिटिव्ह / टक्केवारी

१ / ७०४८ / ११२ / १.५८

२ / ५६९० / १७५ / ३.०७

३ / ५२७१ / १४९ / २.८२

४ / ४८७६ / ३५० / ७.१७

५ / ७४६३ / ५९० / ७.९०

कोरोना व ओमिक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या सूचनांनुसार उपाययोजना केल्या जात आहेत. परदेशातून शहरात आलेल्या प्रवाशांचे क्षेत्रीय कार्यालय स्तरावर सर्वेक्षण सुरू आहे. त्यांच्यासह त्यांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी केली जात आहे.

- डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

देहूरोड राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या वतीने खड्ढे बुजविले
प्लॅस्टिक बॉटल द्या; चहा प्या, वडापाव खा

जम्बो रुग्णालय १५ जानेवारीपासून

कोरोना संसर्गामुळे जुलै २०२० मध्ये नेहरूनगर येथील मगर स्टेडियमच्या जागेवर महापालिका, पीएमआरडीए व जिल्हा प्रशासनातर्फे ८०० खाटांचे जम्बो रुग्णालय सुरू केले होते. संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने १६ जानेवारीपासून ते बंद केले होते. मात्र, रुग्णसंख्या पुन्हा वाढल्याने सप्टेंबर २०२१ मध्ये महापालिकेच्या नियंत्रणाखाली ते पुन्हा सुरू करण्यात आले होते. नोव्हेंबरपासून रुग्णसंख्या घटल्याने रुग्णालय बंद केले आहे. आता रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने १५ जानेवारीपासून रुग्णालय सुरू करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे.

अशी असेल सुविधा

  • ऑक्सिजन बेड - ६००

  • आयसीयू बेड - २००

  • एकूण बेड - ८००

दृष्टिक्षेपात जम्बो रुग्णालय

  • कालावधी २ महिने - १५ जानेवारी ते १४ मार्च २०२२

  • अंदाजे खर्च - १० कोटी १४ लाख रुपये

  • प्रतिदिन बेडचे दर - ऑक्सिजन १४०४.४८, आयसीयू ४३८५.९२ रुपये

  • नियंत्रण - महापालिका

  • मनुष्यबळ - मेडब्रोज हेल्थकेअर डायग्नॉस्टिक सेंटर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()