Eknath Khadse
Eknath KhadseSakal

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गैरव्यवहार बाहेर काढणार; एकनाथ खडसे

भविष्यात आमची सत्ता आल्यास सर्व भ्रष्टाचार बाहेर काढून संबंधित गैरव्यवहार करणाऱ्यांना जेलमध्ये पाठविणार आहे,’ असा इशारा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिला.
Published on
Summary

भविष्यात आमची सत्ता आल्यास सर्व भ्रष्टाचार बाहेर काढून संबंधित गैरव्यवहार करणाऱ्यांना जेलमध्ये पाठविणार आहे,’ असा इशारा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिला.

जुनी सांगवी - ‘पिंपरी-चिंचवड महापालिकेत (Pimpri Chinchwad Municipal) माझ्यामुळे सत्ता (Power) आली होती. ती आता मला बदलायची आहे. शहरात चोवीस तास पाणी (Water) देण्याची घोषणा खोटी ठरली असून, पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. भविष्यात आमची सत्ता आल्यास सर्व भ्रष्टाचार (Corruption) बाहेर काढून संबंधित गैरव्यवहार (Malpractices) करणाऱ्यांना जेलमध्ये पाठविणार आहे,’ असा इशारा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिला.

शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेटी देत खडसे यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. यात पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, जुनी सांगवी, नवी सांगवी या भागातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. नवी सांगवीतील एका जनसंपर्क कार्यालयाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आगामी महापालिका निवडणुका तोंडावर असल्याने या भेटींना महत्त्व प्राप्त झाले आहे. येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शहरांतील विविध भागात त्यांचे स्वागत कमानी उभारत, फटाक्यांची आतषबाजी करीत जंगी स्वागत केले. पिंपरी चिंचवड शहर व नवी सांगवी पिंपळे गुरव जुनी सांगवी परिसरात खानदेशी मंडळी मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत.

Eknath Khadse
मतदार यादीतून वगळलेल्या नावांसमोर मारणार डिलीट शिक्का

खडसे म्हणाले, ‘भाजपाकडून ओबीसी समाजाचा केवळ मतांसाठी वापर केला जातो, ते मला मान्य नव्हते. मी सायकलवरून प्रचार केलेल्या पक्षाने मला डावलले ही अनपेक्षित बाब होती. तसेच खानदेशचा मुख्यमंत्री झाला नाही. मी पुन्हा पुन्हा येणार म्हणणारे आज कुठे आहेत?’

चंद्रकांत पाटील यांच्यावर बोलताना खडसे म्हणाले, ‘चंद्रकांत पाटील सरकार पाडण्याचा मुहूर्त काढतात. पण तो मुहूर्त निघूच शकत नाही.’ या वेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, रविकांत वरपे, प्रशांत सपकाळ, शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, शिरीष साठे, श्याम जगताप, शिवाजी पाडुळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()