श्री हनुमान उत्सवानिमित्त तळेगावात विविध कार्यक्रम
तळेगाव दाभाडे, ता. २३ : तळेगाव स्टेशनचे ग्रामदैवत श्री हनुमान उत्सवानिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. श्री हनुमान उत्सव उत्साहात साजरा झाला. हनुमान मंदिरात श्रीची पूजा, अभिषेक, महाप्रसाद, भजन, हनुमान चालिसा पुस्तक वाटप, पालखी सोहळा आदी धार्मिक कार्यक्रम झाले. भंडाऱ्यात अन्नदान करण्यात आले. सायंकाळी मनोरंजनासाठी पारंपरिक लावण्या आणि भक्ती गीतांचा ऑर्केस्ट्राचा रसिकांनी आनंद घेतला. श्री हनुमंतांची पालखी छबिन्याची ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. पारंपरिक प्रथेनुसार पालखी छबिन्याला मानाच्या भोई समाजाने खांदा दिला. श्री हनुमान मंदिरापासून मुख्य बाजारपेठ, स्टेशन मार्गे तळेगाव जनरल हॉस्पिटल चौक, राजगुरव कॉलनी, फलकेवाडी, पवार वाडीमार्गे जुन्या ईगल कंपनी गेटवर पालखी मार्गाची आरती झाली. आरती करून पालखी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेसमोरून लांडेवाडा मार्गे मुख्य हनुमान मंदिरात रितीरिवाजाप्रमाणे रात्री बाराच्या आत मुख्य गाभाऱ्यात दाखल झाली.
नागरिकांची श्री हनुमान मंदिरात दर्शनासाठी गर्दी होती. मंदिर फुलांनी सुशोभित केले होते. परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केलेली होती. मंदिर परिसरात अनेक खेळणी, मिठाई, भेळ दुकानात खरेदी साठी गर्दी होती. बालचमूंनी खेळण्याचा व पाळण्यात बसण्याचा आनंद लुटला.
पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील तळेगाव-चाकण- रांजणगाव येथील इंडस्ट्रिअल हब आणि पिंपरी-चिंचवडमधील रेसिडेन्सिअल कॉरिडॉरच्या दृष्टीने भविष्यातील २५ वर्षांचा विचार करता खेड तालुक्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ व्हावे, अशी आमची मागणी आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा असल्याचे आमदार लांडगे यांनी सांगितले. पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक पट्ट्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ (International Airport)होणे गरजेचे आहे.
गेल्या १० वर्षांपासून विमानतळाचा प्रश्न प्रलंबित होता. राज्यातील तत्कालीन फडणवीस सरकारने पुरंदर येथील जागेची निवड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने जागेत बदल केला. आता संरक्षण मंत्रालयाने ‘साईट किल्अरन्स’ नाकारला आहे. त्यामुळे खेड तालुक्यातच विमानतळ व्हावे, असेही लांडगे यांनी सांगितले.(Pune news)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.