एड्सच्या जनजागृतीसाठी ‘सक्षम’कडून आरोग्य तपासणी शिबिर
पिंपरी : सक्षम फाउंडेशन व असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टस पिंपरी चिंचवड यांच्यावतीने निगडी- ट्रान्सपोर्टनगरी येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात स्थलातरीत कामगारांना एड्सबद्दल माहिती देऊन, जनजागृती करण्यात आली. ७५ जणांनी शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये सक्षम फाउंडेशनमार्फत (Saksham Foundation) या परजिल्ह्यातील कामगारांची एचआयव्ही तपासणी करून औषध पुरवठा करण्यात आला. यावेळी कामगारांना फाउंडेशनच्या प्रकल्प व्यवस्थापक स्नेहल माहुलकर यांनी एड्सबद्दल माहिती देऊन जनजागृती केली. (AIDS Awareness Camp)
त्या म्हणाल्या, ‘‘एचआयव्ही चाचणी व उपचार यांच्यातील दरी दूर करण्यासाठी असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टसच्या मदतीने स्थलारीत कामगार व मालक यांच्या युनियन यांना सोबत घेऊन एक मोहीम राबवित आहोत.’’ शिबिरामध्ये तालेरा रुग्णालयाचे आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ अनिता बुरूडे, प्रकल्प समुपदेशक वृषाली महाकाळ, आरोग्य सेवक पूजा माने, सुनील मोकल यांनी रुग्णांची तपासणी केली. शिबिरासाठी फाउंडेशनचे संचालक अमर कदम यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले. यावेळी असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टसचे अध्यक्ष प्रमोद भावसार, उपाध्यक्ष सुमीत धुमाळ, सचिव अनुज जैन, सदस्य सतनाम सिंह पन्नू, मंजीतसिंह संधू, सुरेशकुमर नेहरा, रमेश चौधरी उपस्थित होते.(Pune News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.