water-tax
water-taxsakal

देहूरोड : पिण्याच्या पाण्यासाठी १,८०० रुपये दर वर्षाला आकारावा

नागरिकांना घरगुती वापरासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी १,८०० रुपये दर वर्षाला आकारावा.
Published on
Summary

नागरिकांना घरगुती वापरासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी १,८०० रुपये दर वर्षाला आकारावा.

देहूरोड - नागरिकांना घरगुती वापरासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी (Drinking Water) १,८०० रुपये दर वर्षाला आकारावा आणि व्यावसायिक दराची रक्कमही कमी करण्याची मागणी देहूरोडमधील सर्वपक्षीय नेत्यांनी देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल (Ramswarup Haritval) यांच्याकडे सोमवारी (ता. ३१) बैठकीत केली.

बोर्डाचे आर्थिक उत्पन्न घटल्याने बोर्ड प्रशासनाने पाणी बिल, रुग्णालयाच्या केसपेपरमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे देहूरोडमधील विविध राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तर पाणी बिलाची रक्कम भरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे बोर्ड प्रशासनापुढे प्रश्न निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य अॅड. कैलास पानसरे, राष्ट्रवादी कॅाग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. कृष्णा दाभोळे, हाजीमलंग मारिमुत्तू, बाळासाहेब शेलार, भरत नायडू, रघुवीर शेलार व इतर हरितवाल यांच्याबरोबर बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी सर्वांनी पाणी बिलातील दरवाढीला विरोध केला.

water-tax
दहावी- बारावीतील विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी आता गुगल फॉर्म

हरितवाल म्हणाले, की पाणी बिलातील वाढ फार मोठ्या प्रमाणात नाही. वर्षाला पाणी योजनेवर होणारा खर्च आणि पाणी बिलातून होणारी वसुली यात मोठा फरक आहे. योजना भविष्यात बंद पडेल. तसेच गेले अनेक वर्ष पाणी दरात वाढ केलेली नाही. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार आणि बोर्डात मंजूर झालेल्यानुसार ही दरवाढ आहे.

वसुलीसाठी सहकार्य करा

पाणी बिलाची थकीत रक्कम वसुलीसाठी उपस्थित नेत्यांनी पुढाकार घ्यावा आणि बोर्डाला वसुलीसाठी सहकार्य करावे. बोर्ड प्रशासनाने दर महिन्याला नागरिकांना वेळेत पाणी बिल दिले तर ही वेळ येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने प्रत्येक वॉर्डातून नागरिकांना सामावून घ्यावे. तसेच सहा महिने अथवा वर्षाला पाणी बिल देवू नये, अशी मागणीही बैठकीत कार्यकर्त्यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()