पिंपरी : आगामी निवडणूक भोसरी विरुद्ध भोसरी
गेल्या २०-२२ वर्षांचा शहराच्या राजकारणाचा इतिहास पाहिल्यास सलग तीन टर्म अर्थात २००२ पासून २०१७ पर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसची महापालिकेत एकहाती सत्ता.
पिंपरी - ते दोघे भोसरीचे... (Bhosari) लहानाचे मोठे होत भोसरी गावाचा पर्यायाने पिंपरी-चिंचवडचा (Pimpri Chinchwad) विकास (Development) पाहात मोठे झालेले... एकमेकांचे स्वभाव, कार्यपद्धती आणि एकमेकांचे नाते-गोते व गावकी-भावकी माहिती... दोघेही २०-२५ वर्षांपासून राजकारणात (Politics) सक्रीय... विविध राजकीय पदांवर काम...पक्ष संघटन माहिती... मात्र, दोघांचीही राजकीय विचारसरणी भिन्न...शहराच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दोन वेगवेगळ्या पक्षात सक्रीय आणि आता पक्षाच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी खांद्यावर. आगामी महापालिका निवडणूक दोन्ही पक्ष त्यांच्याच नेतृत्त्वाखाली लढणार आहेत. हे दोघे म्हणजे भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे (Mahesh Landage) आणि राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष तथा नगरसेवक अजित गव्हाणे (Ajit Gavhane) होत. आपापल्या पक्षाच्या अस्तित्वासाठी त्यांच्या नेतृत्वाचा महापालिका निवडणुकीत कस लागणार, हे नक्की!
गेल्या २०-२२ वर्षांचा शहराच्या राजकारणाचा इतिहास पाहिल्यास सलग तीन टर्म अर्थात २००२ पासून २०१७ पर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसची महापालिकेत एकहाती सत्ता. विरोधी पक्षाच्या भूमिकेत कॉंग्रेस. मात्र, २०१७ च्या निवडणुकीत त्यापूर्वी बोटावर मोजण्याइतके अस्तित्व असलेल्या भाजपला एकहाती सत्ता मिळाली. राष्ट्रवादी विरोधी पक्षाच्या भूमिकेवर समाधान मानावे लागले. कॉंग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. शिवसेना दोन आकडी संख्या गाठू शकली नाही. मनसेला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे गेल्या पाच वर्षात शहराचे राजकारण महापालिकेतील सत्ताधारी भाजप विरुद्ध विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस असेच राहिले आहे.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीत चित्र कसे राहिल याची उत्सुकता आहे. कारण, भाजपचे शहराध्यक्षपद लांडगे यांच्याकडे आहे. आणि आता राष्ट्रवादीने शहराध्यक्षपदाची जबाबदारी भोसरीतील ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे यांच्याकडे देत भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यात नाते-गोत्यांसह गावकी-भावकीचेही संबंध आहेत. त्यामुळे आगामी निवडणूक ‘भोसरी’करांसाठी कसोटीची ठरणार आहे.
लांडगे यांचा राजकीय प्रवास
२००२ - काँग्रेस - महापालिकेची निवडणूकीत पराभव
२००४ - राष्ट्रवादी - नगरसेवक
२००७ - राष्ट्रवादी - नगरसेवक
२०१२ - राष्ट्रवादी - नगरसेवक
२०१४ - राष्ट्रवादी - स्थायी समिती अध्यक्ष
२०१४ - अपक्ष - आमदार
२०१९ - भाजप - आमदार
२०२० - भाजप - शहराध्यक्षपद
गव्हाणे यांचा राजकीय प्रवास
२००२ - भाजप - नगरसेवक
२००४ - भाजप - स्थायी समिती सदस्य
२००६ - राष्ट्रवादीत प्रवेश
२००७ - राष्ट्रवादी - नगरसेवक
२००७ - राष्ट्रवादी - स्थायी समिती अध्यक्ष
२०१२ - राष्ट्रवादी - नगरसेवक
२०१७ - राष्ट्रवादी - नगरसेवक
२०२२ - राष्ट्रवादी - शहराध्यक्षपद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.