उधेवाडीत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर
सोमाटणे, ता. १६ ः उधेवाडी येथील आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरात नागरिकांनी मोठा सहभाग घेतला. ग्रामिण भागातील नागरिकांमध्ये असणाऱ्या विविध आरोग्य समस्या सोडवण्यासाठी रोटरी क्लब ऑफ एमआयडीसीचे संस्थापक संतोष खांडगे यांच्या पुढाकाराने व नागरे हॉस्पिटल, तळेगाव जनरल रुग्णालय, सांगती सह्याद्री ग्रुप यांच्या सहकार्याने मावळातील दुर्गम भागातील उधेवाडी गावात आरोग्य तपासणी व मोफत उपचार शिबिर घेण्यात आले.
या शिबिरात डॉ. नितीन नागरे, डॉ. सुरभी नागरे, त्यांचे सहकारी यांच्या वतीने गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात विविध व्याधी असणाऱ्या एकशे पन्नास रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात आले. पार्वती नेत्रालयाचे प्रमुख डॉ. अशोक दाते यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील विविध विभागातील डॉक्टरांच्या वतीने गावातील सर्व नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. यात किरकोळ दोष असणाऱ्या रुग्णांवर मोफत औषधोपचार करून त्यांना चष्मे देण्यात आले. दहा जणांना मोतीबिंदू दोष आढळल्याने त्यांच्यावर तातडीने प्रथमोपचार करून मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी सोय करण्यात आली. क्लबचे अध्यक्ष सुमती निलवे, विल्सन सालेर, प्रवीण भोसले, सचिन कोळवणकर, मिलिंद शेलार, लक्ष्मण मखर आदींनी शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.