कोरोना काळात विनामास्क सापडले होते ५१ हजार नागरिक
पिंपरी, ता. २ : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घातलेले निर्बंध हटविल्याने आता मास्क घालणे ऐच्छिक झाले आहे. मात्र, कडक निर्बंधाच्या काळात विनामास्क फिरणाऱ्या ५१ हजार ६७० जणांवर कारवाई करत वाहतूक पोलिसांनी तब्बल दोन कोटी ५६ लाख ५८ हजारांचा दंड वसूल केला आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूक पोलिस महत्त्वाचे चौक, सिग्नल व विविध ठिकाणी नाकाबंदी करत.
विनामास्क घराबाहेर पडल्यानंतर समोर अचानक पोलिसांनी अडविल्यास विविध करणे पुढे केली जायची. श्वास घेण्यास त्रास होतो, समोरचे दिसत नाही, मास्क होता पण आत्ताच हरवला आदी हास्यास्पद कारणे सांगितली जायची. तसेच कारवाई टाळण्यासाठी केवळ नावापुरते मास्क गळ्यात अडकवायचा. त्यानंतर बिनधास्तपणे वाटेल तेथे पिचकाऱ्या मारायच्या. मात्र, अशातच समोर पोलिस दिसल्यास गळ्यातला मास्क अचानक तोंडावर यायचा. अनेकजण तर शर्ट, साडी, ओढणी अथवा मिळेल ते कापड तोंडावर गुंडाळायचे अशी स्थिती त्यावेळी होती.
------------------------------
सप्टेंबर २०२० ते ३१ जानेवारी २०२२ दरम्यान झालेली कारवाई
वाहतूक विभाग कारवाई दंड (रक्कम लाखात)
सांगवी ५,९९९ २९, ९९, ५००
हिंजवडी ५,६५४ २८, २७, ०००
निगडी ३,८९३ १९, ४६,५००
चिंचवड ४,७१४ २३, ५७, ०००
पिंपरी ४,९७१ २४, ८५, ५००
भोसरी ५,४८८ २७, ४४, ०००
चाकण ५,६०१ २८, ०० ५००
दिघी-आळंदी ५,२११ २६, ०५, ५००
देहूरोड ४,८४८ २२, ४७, २००
तळवडे ५,०६२ २५,३१, ०००
वाकड ८६ ४३ हजार
तळेगाव ५९ २९ हजार ५००
म्हाळुंगे ८४ ४२ हजार
---------------------------------------------
एकूण ५१, ६७० २, ५६, ५८, २००
---------------------------------------------
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.