अॅनेमिया मुक्त पिंपरी-चिंचवड करू या

अॅनेमिया मुक्त पिंपरी-चिंचवड करू या

पिंपरी, ता. ६ ः ‘अॅनेमिया मुक्त पिंपरी-चिंचवड’ हे अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता आणि व्यापक पद्धतीने काम करून शहराला अॅनेमिया मुक्त करा, असे आवाहन महापालिका प्रशासक राजेश पाटील यांनी केले.
चिंचवड येथील ऑंटो क्लस्टर सभागृहात ‘अॅनेमियामुक्त पीसीएमसी’ मोहीम पूर्व आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उपायुक्त संदीप खोत, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे बालरोग विभागप्रमुख डॉ. शरद आगरखेडकर यांच्यासह विविध शाळांचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पाटील म्हणाले, ‘‘शहराला अॅनेमियामुक्त करणे हा मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक वयोगटातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून या विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ही योजना यशस्वी पद्धतीने कार्यान्वित करण्यासाठी विशिष्ट अंमलबजावणी धोरण तयार करण्यात आले आहे. शिक्षित कुटुंबातही अॅनिमिया बद्दल जागरूकता कमी असल्याचे बघायला मिळते. अॅनिमियामुळे बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ कमी होणे तसेच संसर्गजन्य रोगास बळी पडणे यासारखे दुष्परिणाम होतात. या आजाराची व्याप्ती खूप मोठी असून त्यावर गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. यात येणाऱ्या समस्यांवर मात करून या मोहिमेला बळकट करायचे आहे. या मोहिमेसाठी व्यापक व्यवस्थापन करण्यासाठी चर्चासत्राच्या माध्यमातून मार्ग सापडतील. या विषयाकडे सर्वांनी संवेदनशीलतेने पाहावे.’’

लोहयुक्त गोळ्या देणार
मोहिमेंतर्गत अनेक उपक्रम राबवण्यात येणार असून त्यावर कशा पद्धतीने कार्यवाही करावी यासाठी या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. ‘अॅनेमिया मुक्त पीसीएमसी’ या उपक्रमाचे १०० टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रामुख्याने सहा महिने ते १९ वर्षे वयोगटातील मुले-मुली, गर्भवती व स्तनदा माता आणि वय २० ते ४९ वयोगटातील महिला यांच्यातील लोहाची कमतरता, रक्तक्षय ओळखून त्यावर प्रतिबंधात्मक पचार करण्यासाठी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यात प्रतिबंधात्मक जंतनाशक गोळी, प्रतिबंधात्मक आयर्न फोलिक अॅसिड गोळी तसेच रक्तक्षयाकरता चाचणी आणि उपचार याचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com