"माय लर्निंग्स फ्रॉम डाय कास्टिंग.." सोप्या भाषेत डाय-कास्टिंगचे सविस्तर वर्णन करणारे पुस्तक प्रकाशित
“आपल्या व्यावसायिक आयुष्यात जे आपण काम करून ज्ञान मिळवतो त्याचा आपल्या समाजाला खूप चांगला उपयोग झाला तर आपल्या कामाचे खरे चीज होते.आज ह्या कार्यक्रमात श्री.सुरेश सोनावणे ह्यांनी एकदम सोप्या भाषेत डाय-कास्टिंगचे सविस्तर वर्णन केलेले आहे.
त्यात त्यांनी खूप महत्वाचे मुद्दे घेतले आहेत.सुरक्षा….आपण काम करत असताना सुरक्षा कशी घेतली पाहिजे;आपण काम करत असताना अधूनमधून निष्काळजीपणा करत असतो ज्याला आपण नेग्लिजन्स म्हणत असतो.
नेग्लिजन्समुळे कोणते दुष्परिणाम होऊ शकतात; हयाबद्दल त्यांनी खूप सोप्या भाषेत लिहिले आहे जे मशीनवर काम करणार्या कामगाराला देखील कळेल. आपले ज्ञान आपण जेव्हा दुसर्याला शेअर करतो तेव्हा आपले देखील ज्ञान वाढत जाते.ज्याला आपण म्हणतो 'knowledge sharing is knowledge gaining.'
३० जून-२०२३ रोजी चाकण एम.आय.डी.सी मध्ये कॅश्टोमॅक ग्लोबल प्रायवेट लिमिटेड ह्या कंपनीत “माय लर्निंग्स फ्रॉम डाय कास्टिंग” ह्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात श्री.सागर भोसले(एमडी.शेमरसल इंडिया) बोलत होते.
श्री.सुरेश सोनावणे ह्यांनी लिहीलेल्या पुस्तकाचे प्रकाशन “ ए.के.मार्केटिंग सोल्यूशन्स इचलकरंजी” ह्यांच्या मार्फत करण्यात आले. हे पुस्तक इ-बुकच्या स्वरुपात अमेझोन आणि गुगलवर प्रकाशित करण्यात आले आहे आणि ह्याच्या प्रती कंपनीकडे उपलब्ध आहेत.
सदरचा प्रकाशन सोहळा यशस्वी करण्यासाठी कॅश्टोमॅकच्या टीमने अथक परिश्रम घेतले.ह्या कार्यक्रमास कंपनीचे एम.डी श्री.तुषार बाफना, श्री.अनुप सकलेचा, श्री.बाळू जोगदंड,ओंकार गंगधर, शेमरसल कंपनीचे भारताबाहेरील प्रतींनिधी हेनिंग कार्ल, पुण्याचे प्लांट हेड ज्ञानेश्वर पांगारकर, चाकण परिसरातील उद्योजक आणि कॅश्टोमॅक कंपनीचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.