todays-latest-marathi-news dapodi waste dumping causes health issue to resident
todays-latest-marathi-news dapodi waste dumping causes health issue to residentsakal

Pune News : दापोडीतील कचऱ्यामुळे आरोग्याला धोका, परिसराला बकालपणा

कचरा वेळेत उचलण्याची नागरिकांची मागणी
Published on

जुनी सांगवी : दापोडी येथे कचरा संकलन करून, तो वेळेत उचलला जात नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचऱ्यामुळे परिसराला बकालपणा आला आहे. याचबरोबर ओसंडून वाहणाऱ्या कचराकुंड्याचा त्रास विद्यार्थी, चाकरमानी मंडळी यांना सोसावा लागत आहे.

येथील सी. एम. ई. भिंत, नदी किनारा परिसर, अत्तार वीटभट्टी, मुंबई-पुणे मुख्य रस्त्याचे भुयारी मार्ग, सिद्धार्थनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक गावठाण दरम्यान रस्त्यालगत असलेल्या मैदानावर उघड्यावर कचरा अस्ताव्यस्त पसरलेला असतो.

यातच भटकी कुत्री, भटकी जनावरे व वाऱ्यामुळे हा कचरा संपूर्ण मैदानावर पसरला जातो. दापोडी परिसरातील कचरा संकलन वेळेत करून कचरा साचून न ठेवता कचरा तत्काळ उचलण्यात यावा, अशी मागणी रिपाई आठवले गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

todays-latest-marathi-news dapodi waste dumping causes health issue to resident
Pune News : भोर तालुक्यातील भाटघर धरण क्षेत्रातील दुर्गम भागात तरंगत्या दवाखान्याद्वारे आरोग्य सेवा

कचराकुंडीमुक्त प्रभागाचा फज्जा
कचराकुंडीमुक्त प्रभाग करताना कचराकुंड्या काढून टाकण्यात आलेल्या ठिकाणी कचरा पडत आहे. अपुरी यंत्रणा, अपुरे मनुष्यबळ व अनियमितता यामुळे कचरा साचून राहत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी प्रभागातील कचरा संकलनासाठी - ६ गाड्या, २ मोठ्या गाड्या, एकूण मनुष्यबळ - ६९

‘‘साचून राहिलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शालेय विद्यार्थी, कामगार यांना दुर्गंधीचा त्रास सहन करत ये-जा करावी लागत आहे.’’
- चंद्रकांता सोनकांबळे, प्रदेशाध्यक्षा, महिला आघाडी, रिपाइं

‘‘परिसरातील कचरा नियमित उचलला जात आहे. मोकळ्या जागा, मैदाने, अडगळीच्या बाजूला पडणारा कचरा रोखण्यासाठी अनेकदा रात्री अकरापर्यंत कर्मचारी उभे करण्याचा प्रयत्न करूनही हॉटेल व्यावसायिक, भाजी विक्रेते, खाऊ गल्लीचा कचरा व घरातून निघताना चाकरमानी मंडळी कचरा टाकतात. नागरिकांनी कचरा गाडीतच कचरा द्यावा.’’
- उमेश जाधव, सहायक आरोग्य अधिकारी, दापोडी विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.