गुरु पौर्णिमा पुरवणी साठी- श्री सद्गुरु शिवाय अध्यात्मिक वाटचाल परिपूर्ण होत नाही - ह.भ.प.तुकाराम भाऊ महाराज दत्त आश्रम जुनी सांगवी.
साधकांचे गुरुकुल श्री दत्त आश्रम
- दत्तसेवक तुकारामभाऊ महाराज, सांगवी
साधकाला किंवा शिष्याला आत्मानुभूती असेल किंवा सगुण परमेश्वराची भेट असेल, साक्षात्कार असेल तो केवळ श्री गुरूंच्या कृपेनेच प्राप्त होत असतो. वैदिक काळापासून श्री गुरू-शिष्य परंपरा अखंडितपणे निरंतर सुरू आहे. म्हणून श्री गुरुपौर्णिमा हे पवित्रपर्व साजरे केले जाते. इतिहास असे सांगतो, की जेव्हा महर्षी वेद व्यास ऋषींनी सकल ग्रंथ संपदा निर्माण केली. वेदांचे विभाजन, १८ पुराणांची रचना व पवित्र महाभारताची रचना केली. त्यामुळे सर्व देवता लोक महर्षी वेदव्यास ऋषींची पूजा करण्यासाठी येतात, त्या तिथीला ‘श्री गुरुपौर्णिमा’ असे म्हणतात. अर्थात जे पवित्र आध्यात्मिक ज्ञान आहे, ते सर्वश्रेष्ठ ज्ञान महर्षी वेदव्यास ऋषींनी सकल मानवाचे कल्याण व्हावे, यासाठी दिले. त्यांचे स्मरण म्हणून गुरुपौर्णिमेलाच व्यासपौर्णिमा किंवा व्यासपूजा पौर्णिमा असे म्हणतात. जुनी सांगवीत प. पू. अवधूत बालयोगी श्री नंदकुमार महाराज यांनी श्री दत्त आश्रमाची स्थापना केली. या आश्रमामध्ये भगवान श्री गुरुदत्तात्रेयांची उपासना केली जाते. त्रिकाल नित्य संध्या आरती होते. तथा श्री दत्त जयंती संगीत महोत्सव, श्री गुरुपौर्णिमा, नवरात्री महोत्सव, परमपूज्य अवधूत बालयोगी नंदकुमार महाराज पुण्यतिथी कीर्तन सप्ताह हे वार्षिक कार्यक्रम होत असतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात येतात. मात्र, त्यांची राहण्याची व्यवस्था होत नाही. अशा गरीब, हुशार व होतकरू विद्यार्थ्यांची व्यवस्था श्रीदत्त आश्रमात निःशुल्क केली जाते. मुळा नदी परिसरात असलेल्या दत्त आश्रमात अतिशय निसर्गरम्य वातावरणात निवासी गुरुकुल पद्धती जोपासली आहे. ध्यानधारणा, आध्यात्मिक सत्संग, शास्त्रीय संगीताचा अभ्यास, धार्मिक पुस्तकाचे ग्रंथालय या सर्व गोष्टी आश्रमात निरंतर चालू आहेत, असा हा अतिशय पवित्र भक्तिमय व आनंद देणारा हा प.पू.बालयोगी नंदकुमार महाराज यांनी दिलेला श्री दत्त आश्रमाचा सेवेचा वसा सुरू ठेवला आहे.
फोटो ः 15855, 15856
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.