उपोषणानंतर ज्येष्ठाला मिळाला न्याय हिंजवडीतील घरासाठी परवानग्या घेऊनही मानसिक त्रास
पिंपरी, ता. १६ : हिंजवडी येथे एका ज्येष्ठ नागरिकाने प्रशासनाच्या विरोधात
उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर अखेर त्याला न्याय मिळाला.
नितीन शरद गोटे असे त्यांचे नाव आहे. त्यांनी स्वत:च्या मालकीच्या भूखंडावर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन घर व इमारत बांधली. कालांतराने पुणे महानगर विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) जोते तपासणी व भोगवटा प्रमाणपत्र मिळविले. परंतु; ‘पीएमआरडीए’ने या भागातील होणारा रस्ता अधिगृहित केला नसल्याने मोकळ्या जागेवर अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले. या भागातील जमीन मालक व इमारत मालकांनी एकत्र येऊन, अधिकाऱ्यांना हाताशी धरुन हा रस्ताच रद्द केला व गोटे यांच्या अधिकृत इमारतीवर आरक्षण टाकण्याचा प्रयत्न केला. याबाबत हरकत घेऊन वारंवार हेलपाटे मारुन प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे गोटे यांनी सुरवातीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व नंतर पीएमआरडीए कार्यालयासमोर उपोषण केल्यानंतर त्यांना अखेर न्याय मिळाला.
गोटे यांनी हिंजवडीत ४ हजार ८६८ चौरस फुटाच्या भूखंडावर घर व इमारत बांधली. या सर्वे क्रमांकांमध्ये नगरविकास विभागाने ३० मीटरचा रस्ता प्रस्तावित केला होता. तो रस्ता गोटे यांच्या भूखंडातून अंशत: जात होता. त्यानंतर हा रस्ता ३० मीटरच्या ऐवजी १५ मीटर करण्यात आला. हा रस्ता मध्यापासून कमी करणे आवश्यक असताना नियम तोडून गोटे यांच्या बाजूचा रस्ता तसाच ठेवून दक्षिणेकडून १५ मीटर कमी करण्यात आला, असे गोटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोटे यांनी ६ नोव्हेंबर २०२३ पासून पुढे चार दिवस उपोषण केले. त्यानंतर तहसीलदार अजित कुऱ्हाडे यांनी ‘पीएमआरडीए’ आयुक्तांना पत्र देवून आपल्याकडील विषय असल्याने उचित कार्यवाही करावी, असे पत्र दिले. त्यानंतर गोटे यांनी आकुर्डी प्राधिकरण येथील पीएमआरडीए कार्यालयासमोर ४ ते ११ डिसेंबर उपोषण केले. त्यामुळे प्रशासनाला उपरती आली व ‘पीएमआरडीए’च्या सहमहानगर नियोजनकार श्वेता पाटील यांनी गोटे यांना पत्र दिले. या दरम्यान, पोलिसांनी गोटे यांना दोनदा समजपत्र दिली होती.
फोटो ः 89940, 89941
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.