‘यिन’तर्फे आयोजित ‘दिवाळी फनफेअर’ उत्साहात
पिंपरी, ता.९ : दिवाळी महोत्सवानिमित्त औद्योगिक शिक्षण मंडळाच्या कॉलेज ऑफ कॉमर्स सायन्स ॲन्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयात ‘यिन’च्यावतीने दिवाळी फनफेअरचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी तयार केलेल्या विविध दिवाळी साहित्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तू विक्री व प्रदर्शन भरविण्यात आले.
या फनफेअरमध्ये स्वाती कांबळे, सोनाली परीक, दिपाली चोप्रा, हिना शेख, सुजाता आहेर, श्वेता देवकर, रिमा मेहेक, श्री स्वामी महिला बचत गट, श्री योग महिला बचत गट, सुहाना इनामदार, अभिषेक सपकाळ, ‘यिन’ विद्यार्थी रोनी केडुई, ऋषिकेश पवार, संदेश हुरसले आदींनी सहभाग घेतला आहे. दरम्यान, ‘सकाळ’च्या ‘कॉलेज कट्टा’ सदराखाली प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचे फलकावर सादरीकरण करण्यात आले.
यावेळी ए.एस.एम संस्थेचे अध्यक्ष डॉ.संदीप पाचपांडे, सचिव आशा पाचपांडे, प्राचार्य डॉ. ललित कनोरे, उपप्राचार्य सरिता गोयल, प्रा.डॉ.चंद्रशेखर सोनावणे, रोहित भालेराव तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी औद्योगिक शिक्षण मंडळाच्या कॉलेज ऑफ कॉमर्स सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, स्मार्ट सिटी पिंपरी-चिंचवड व पिंपरी-चिंचवड स्मार्ट सारथी यांचे सहकार्य लाभले.
दिवाळी फनफेअरमुळे गरजू स्वयंसेवी संस्था, बचत गट यांना आर्थिक चलन उपलब्ध झाले. विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहाराची माहिती तसेच ग्राहकांसोबतचे व्यवहार करण्याचे ज्ञान प्राप्त झाले.
- जस्टीन मॅथ्यू , व्यवस्थापक, नागरी समन्वयक, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी
फोटो - ८१७१५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.