Pimpri Crime : आर्थिक फसवणूकप्रकरणी बाबाराजे देशमुखला अटक
पिंपरी - जमीन व्यवहारात ७० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी बाबाराजे देशमुख याला पोलिसांनी अटक केली आहे. मावळ तालुक्यातील बेबडओव्हळ येथे २०१३ ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत फसवणुकीची घटना घडली.
या प्रकरणी रवींद्र शिवाजीराव देशमुख (वय- ४८, रा. वडगाव बुद्रूक) यांनी शिरगाव परंदवडी पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. १७) फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रशांत ऊर्फ बाबाराजे गणपतराव देशमुख (वय- ३३, रा. बेबडओव्हळ, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून, पोलिसांनी त्याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबाराजे देशमुख याची बेबडओव्हळ येथे असलेली पाच एकर जमीन वनीकरण विभागात समाविष्ट आहे. दरम्यान, या जमिनीचे तुकडे पाडून (प्लॉटिंग) व्यवहार होत नसतानाही देशमुख याने २५ गुंठे जागेचा फिर्यादी यांच्याशी व्यवहार केला. त्याचा मोबदला म्हणून २५ लाख रुपये फिर्यादीकडून घेतले. त्यानंतर फिर्यादीच्या नावे खरेदीखत करून दिले नाही. तसेच, फिर्यादीचे २५ लाख रुपये परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली.
तसेच, खरेदीखत करायचे असल्यास आणखी ७० लाख रुपये द्यावी लागतील, अशी फिर्यादीकडे मागणी केली. पैसे न दिल्यास तसेच पोलिसात तक्रार केल्यास फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी देऊन पाच लाख रुपये रक्कम खंडणी म्हणून घेतली, असे फिर्यादीत नमूद आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
सोशल मीडियावर प्रसिद्धिझोतात
बाबाराजे देशमुख याच्या नावाने सोशल मीडियात अनेक ग्रुप आहेत. तसेच, बाबाराजे याने स्वतःचे फोटो, व्हिडिओ व मोबाईल फोन रेकॉर्डिंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ‘व्हायरल’ केले आहेत. ‘आपला तीन आकडी सातबारा आहे’ अशी संवादफेक करून, बाबाराजे नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करीत असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.