शवविच्छेदन अहवाल 
वर्षभरानंतरही मिळेना

शवविच्छेदन अहवाल वर्षभरानंतरही मिळेना

Published on

पिंपरी, ता. २३ ः काळेवाडी येथील सरिता सौरभ गायकवाड (वय ३०) यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मृत्यूप्रकरणी शवविच्छेदन अहवाल मिळण्यासाठी वारंवार नातेवाईक वाकड पोलिस स्टेशनचे उंबरठे झिजवत आहे. या घटनेला वर्ष झाले तरी अद्याप त्यांचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांनी दिला नसल्याची तक्रार नातेवाइकांनी केली आहे.
चिंचवड येथील बिर्ला हॉस्पिटल रूग्णालयात सरिता गायकवाड यांचा मृत्यू झाला होता. ही घटना ३ फेब्रुवारी २०२२ मध्ये घडली होती. याप्रकरणी शवविच्छेदनासाठी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात मृतदेह नेण्यात आला होता. डॉ. प्रकाश चौगुले यांनी शवविच्छेदन केले होते. गायकवाड यांचे बंधू सागर शिरसाट यांनी रुग्णालय आणि वाकड पोलिस स्टेशनकडे वारंवार शवविच्छेदन अहवाल मागविला आहे. मात्र, वाकड पोलिसांकडून अद्याप तो नातेवाइकांना दिला नाही. शवविच्छेदन अहवाल रुग्णालयाकडून आल्‍यानंतर तो दिला जाईल, असे वाकड पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. परिणामी, नेमका मृत्‍यू कशामुळे झाला आहे. याचा शोध अद्यापही पोलिसांना घेता आला नाही. मुख्‍य म्हणजे शवविच्छेदन अहवालही आलेला नाही.

व्हिसेरा हा पुणे येथील न्याय वैधक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल अजून आला नाही. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला नाही. इतकीच माहिती पोलिसांकडून मिळत असल्याचे बंधू शिरसाट यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण
सरिता सौरभ गायकवाड (वय ३०) यांचे ३ फेब्रुवारी २०२२ रोजी बिर्ला हॉस्पिटलमध्ये हदयरोगामुळे निधन झाल्याचे सांगण्यात आले. मृतदेह वायसीएम हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टेमसाठी नेण्यात आला. परंतु मृत्यू हा नेमका कुठल्या कारणाने झाला आहे, याची माहिती मिळावी. यासाठी वामन गजभार यांनी माहिती अधिकारात माहितीदेखील मिळवली होती. त्यात मृत्यूचे कारण न देता व्हिसेरा राखून ठेवलेला आहे. अद्याप मृत्यूचे कारणाबाबत अहवाल अभिलेखावर प्राप्त झालेला नाही, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.


कोट
‘‘नेमका कशामुळे शवविच्छेदन अहवाल मिळालेला नाही, याची माहिती घ्यावी लागेल. रुग्णालयाकडूनदेखील माहिती मिळालेली नाही. याची चौकशी करावी लागेल. ’’
-रामचंद्र घाडगे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) वाकड पोलिस ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()