Pawana Dam
Pawana Damsakal

Pimpri News : पावसाने ओढ दिल्यास शहरात आणखी पाणीकपात; महापालिकेचे नियोजन

पिंपरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात ३० जुलैपर्यंत पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे.
Published on

पिंपरी - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात ३० जुलैपर्यंत पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. गेल्या तीन दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाला सुरवात झाली आहे. मात्र, त्याचा जोर फारसा नाही. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत २७ जून (मंगळवार) रोजीचा जिवंत व एकूण पाणीसाठा २.२८ दशलक्ष घनमीटरने कमी आहे.

शिवाय, पावसाचे प्रमाणही तब्बल ३१० मिलीमीटरने कमी आहे. पुढील काही दिवसात पावसाचा जोर न वाढल्यास किंवा दडी मारल्यास शहरात आणखी पाणी कपातीचा निर्णय घेण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यामुळे सध्याच्या दिवसाआड ऐवजी दोन दिवसांनी पाणी मिळेल, अशी स्थिती आहे.

मात्र, चांगला पाऊस झाल्यास सद्यःस्थितीप्रमाणे पाणीपुरवठा केला जाणार आहे. म्हणजेच, शहरावरील पाणी कपातीचे संकट टळणे सर्वस्वी पवना धरण क्षेत्रात आगामी काही दिवसांत होणाऱ्या पावसावर अवलंबून आहे.

मावळ तालुक्यातील पवना धरणातून शहराला दररोज ५१० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. गेल्या तीन महिन्यांपासून आंद्रा धरणातून ५० दशलक्ष लिटर पाणी मिळत आहे. प्रायोगिक तत्त्वावर ते वेगवेगळ्या भागात पोचवले जात आहे.

त्यामुळे शहराची तहान भागवण्याची संपूर्ण भिस्त पवना धरणातील पाण्यावर अवलंबून आहे. सध्या शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. शिवाय, जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या पावसाने दडी मारली होती. त्यात उन्हाचा तडाखा होता. त्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन, झपाट्याने पाणीसाठा कमी होत होता. अखेर गेल्या तीन दिवसांपासून पावसाने शहर परिसरासह पवना धरण क्षेत्रात हजेरी लावली आहे.

मात्र, त्याचा जोर म्हणावा तसा नाही. त्यामुळे यावर्षी व गेल्या वर्षी आजच्या (ता. २७ जून) तारखेपर्यंत झालेल्या पावसाच्या प्रमाणात व धरणातील पाणीसाठ्यात तफावत निर्माण झाली आहे. सध्याच्या पाणीसाठ्याचा विचार करता, जुलैअखेरपर्यंत पाणी पुरेल अशी स्थिती आहे. मात्र, पावसाने पुन्हा ओढ दिल्यास पाणी कपातीशिवाय महापालिकेपुढे पर्याय उरणार नाही, अशी स्थिती आहे.

Pawana Dam
Pune News : महापालिकेत समाविष्ट गावांमधील शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक अद्यापही जिल्हा परिषदेच्या ताब्यात

वीजनिर्मिती केंद्रातून विसर्ग

पवना धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून शहरासाठी पाणी सोडले जात आहे. शहराला प्रतिदिन ५१० दशलक्ष लिटर पाणी घेतले जात आहे. वीजनिर्मिती केंद्रातून मंगळवारी ७९८.६० क्युसेकने विसर्ग करण्यात आला. त्यानंतर पाणी नदी पात्रातून रावेत बंधाऱ्यात येते. तेथून अशुद्ध जलउपसा करून भूमिगत वाहिन्यांद्वारे निगडी प्राधिकरण सेक्टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्रात पाठवले जाते. त्यानंतर शहराच्या वेगवेगळ्या भागात पाणी वितरित केले जाते.

पवना धरणाची २७ जूनची स्थिती

वर्ष / पाऊस (मिमी)/ पाणीसाठा (दघमी) / टक्के

२०२२ / ५२० / ४४.५८ / १८.५०

२०२३ / १९० / ४२.३० / १७.५५

फरक / ३१० / २.२८ / ००.९५

(मिमी - मिलीमीटर, दघमी - दसलक्ष घनमीटर)

Pawana Dam
Pimpri Crime : किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्याचा कट उघडकीस; चार पिस्तुलासह दोन संशयितांना अटक

पवना धरणात सध्या जिवंत पाणीसाठा ४२.३३ दशलक्ष घनमीटर आहे. गेल्या वर्षी २७ जून रोजी एकूण पाणीसाठा ७५.७२ दशलक्ष घनमीटर आणि जिवंत पाणीसाठा ४४.५८ दशलक्ष घनमीटर होता. सध्या जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी धरण क्षेत्रात ३१ जुलैपर्यंत एक हजार ५८१ मिलीमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे धरणातील साठा वाढला होता.

- समीर मोरे, शाखा अभियंता, पवना धरण, जलसंपदा

पावसाने ओढ दिल्यामुळे शहर पातळीवर पाणी कपातीचे नियोजन केले होते. ३० जूननंतर त्याची अंमलबजावणी करून, दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन होते. आता पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे पाऊस झाल्यास सध्याच्या नियोजनानुसार, दिवसाआड पाणीपुरवठा सुरू राहील. मात्र, पावसाने ओढ दिल्यास आणखी पाणी कपात करावी लागेल.

- प्रदीप जांभळे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.